CoronaVirus धोक्याचे! कोरोना दिवसेंदिवस अवतार बदलतोय; ११ वे रुप खूपच खतरनाक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 01:03 PM2020-04-28T13:03:08+5:302020-04-28T14:14:40+5:30

A2a व्हायरस हा खूप खतरनाक आणि फुफ्फुसामध्ये मोठ्या प्रमाणावर हल्ला करण्याची क्षमता ठेवणारा आहे.

CoronaVirus is changing its type; 11th form is very dangerous hrb | CoronaVirus धोक्याचे! कोरोना दिवसेंदिवस अवतार बदलतोय; ११ वे रुप खूपच खतरनाक

CoronaVirus धोक्याचे! कोरोना दिवसेंदिवस अवतार बदलतोय; ११ वे रुप खूपच खतरनाक

googlenewsNext

चीनमधून पसरलेल्या कोरोनाने जगभरात थैमान मांडले आहे. याचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला असून युरोपमध्येही या व्हायरसमुळे हजारो बळी गेले आहेत. या व्हायरसवर औषधे शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून आता एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. कोरोना एकाच स्टेजमध्ये असेल तरच शोधलेल्या औषधांचा उपयोग होणार आहे. मात्र, जर कोरोना रुप बदलत असेल तर ही औषधे निष्प्रभ ठरणार आहेत. 


कालच गुजरातच्या संशोधकांनी कोरोनाचे तीन प्रकार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, आज त्यापेक्षाही धक्कादायक माहिती समोर येत आहे. शोध लागल्यापासून कोरोना व्हायरसने तब्बल १० वेळा रुप बदलले आहे. प्रत्येक बदलावेळी कोरोना आणखी खतरनाक बनत चालला आहे. आता त्याचे A2a रुप आहे. हा प्रकार ११ वा आहे. पहिल्या व्हायरसपेक्षा A2a व्हायरस खूप धोकादायक आहे. यामुळे जगभरात या महामारीचा वेगाने प्रसार होत आहे. 


नॅशनल इंन्स्टिट्यूट ऑफ बायोमेडिकल जिनोमिक्स, कल्याणी बंगाल (NIBG) ने केलेल्या एका संशोधनामध्ये हे समोर  आले आहे. एनबीटीने दिलेल्या वृत्तानुसार हा नव्या अवतारातील व्हायरस जगभरात पसरू लागला आहे. निधान विश्वास आणि प्रथा मुझुमदार यांचा हा अभ्यास इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये लवकरच प्रकाशित होणार आहे. 


A2a व्हायरस हा खूप खतरनाक आणि फुफ्फुसामध्ये मोठ्या प्रमाणावर हल्ला करण्याची क्षमता ठेवणारा आहे. SARSCoV व्हायरसनेही नंतर ही क्षमता विकसित केली होती. मात्र, A2a व्हायरस त्यापेक्षा जास्त क्षमतेचा आहे. या शोधामुळे कोरोना व्हायरसवर लस तयार करण्यासाठी मदत मिळणार असल्याचे म्हटले जात आहे. गेल्या ४ महिन्यांपूर्वी कोरोना व्हायरसचे १० प्रकार हे जुन्याच व्हायरसच्या 'O' टाईपचे होते. मात्र, मार्चच्या शेवटच्या आठवड्यात A2a व्हायरसने जुन्हा व्हायरसची जागा घ्यायला सुरुवात केली. 

 

अन्य बातम्या वाचा...

CoronaVirus कोरोनाची लस चोरण्यासाठी चीनचा खटाटोप; अमेरिकेवर मोठा सायबर हल्ला

CoronaVirus शारीरिक संबंधाद्वारे कोरोना पसरतो? वुहानमध्ये संशोधन

एक नाही, तर तीन प्रकारच्या कोरोनाचा देशावर हल्ला; गुजरातचे संशोधक धास्तावले

दिलासा! कोरोना संकटात रोजगार बुडाला? ही सरकारी बँक देणार कर्ज

 

Web Title: CoronaVirus is changing its type; 11th form is very dangerous hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.