Coronavirus: भारतात या आठवड्यात लॉन्च होणार कोरोनावरील सर्वात स्वस्त औषध, एका गोळीची किंमत केवळ ३५ रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 04:56 PM2022-01-04T16:56:42+5:302022-01-04T16:57:36+5:30
Coronavirus in India: मॅनकाईंड फार्मा या आठवड्यामध्ये कोरनावरील सर्वात स्वस्त औषध बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. यातील एका गोळीची किंमत केवळ ३५ रुपये एवढी असणार आहे. कोविड-१९ अँटिव्हायरल औषध मोलनुपिरवीर लॉन्च करण्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे.
नवी दिल्ली - मॅनकाईंड फार्मा या आठवड्यामध्ये कोरनावरील सर्वात स्वस्त औषध बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. यातील एका गोळीची किंमत केवळ ३५ रुपये एवढी असणार आहे. कोविड-१९ अँटिव्हायरल औषध मोलनुपिरवीर लॉन्च करण्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे.
मॅनकाईंड फार्माचे चेअरमन आर.सी. जुनेजा यांनी सांगितले की, मोलुलाईफच्या पूर्ण उपचारांवर १४०० रुपये खर्च होण्याची अपेक्षा आहे. हे औषध एका आठवड्यामध्ये बाजारात येण्याची शक्यता आहे. एका रुग्णाणसाठी मोलनुपिरवीर हे औषध पाच दिवसांपर्यंत दररोज दोन वेळा ८०० मिलिग्रॅम रेकमेंड करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत एका रुग्णाला २०० मिलिग्रॅम औषध म्हणून ४० गोळ्या घेण्याची गरज आहे. याच्या ओरल पिलचे उत्पादन हे १३ भारतीय औषध कंपन्यांकडून करण्यात येईल. त्यामध्ये टोरंट, सिप्ला, सनफार्मा, डॉ. रेड्डीज, नेटको, माइलान आणि हेटेरो यांचा समावेश आहे.
मॅनकाईंड फार्मा देशामध्ये कोविड-१९ चे औषध मोलुलाइफ (मॉलनुपिरेविर) च्या लाँचिंगसाठी बीडीआर फार्मास्युटिकल्ससोबत भागीदारी केली आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने एका वक्तव्यामध्ये सांगितले होते की, या भागीदारींतर्गत बीडीआर फार्माकडून उत्पादन करण्यात येईल. तर विपणण, विक्री, प्रचार, वितरण मॅनकाईंड फार्मा करेल.
मॅनकाईंड फार्माचे वरिष्ठ अध्यक्ष (विक्री आणि विपणण) संजय कौल यांनी सांगितले की, कंपनी कोविड-१९ विरोधातील लढाईला बळ देण्यासाठी सर्वतोपरी पावले उचलेल, तसेच या क्रमामध्ये मोलुलाइफला प्रत्येक ठिकाणी उपलब्ध केले जाईल. डीसीजीआयने कोविड-१९ वरील उपचारांसाठी अँटिव्हायरल औषध मॉलनुपिरेवीरला देशात आपातकालिन वापरासाठी मान्यता दिली होती.
या औषधाच्या परीक्षणासाठी एक हजार रुग्णांवर त्याची चाचणी करण्यात येणार आहे. भारताच्या ड्रग रेग्युलेटरकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या औषधाची निर्मिती आणि मार्केटिंगला परवानही देणाऱ्या पत्राम्ये सांगितले आहे की, तीन महिन्यांच्या आत क्लीनिकल ट्रायलची अपडेट डिटेल्स द्यावी लागेल.