Coronavirus : थर्मल स्कॅनरने ताप मोजण्यासाठी डोक्याऐवजी या भागांची करा तपासणी, मिळू शकतो अधिक अजून निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 04:07 PM2021-05-11T16:07:10+5:302021-05-11T16:28:37+5:30

Coronavirus in India : तुम्ही थर्मल स्कॅनरने डोक्याचे तापमान तपासत असाल तर थोडे थांबा. नव्याने समोर आलेल्या संशोधनामध्ये थर्मल स्कॅनरने कोरोनाच्या तापाची तपासणी करणे हा तपासणीचा योग्य पर्याय नसल्याचे समोर आले आहे.

Coronavirus: Check eyes & fingers instead of the head to measure the temperature with a thermal scanner, more results can be obtained | Coronavirus : थर्मल स्कॅनरने ताप मोजण्यासाठी डोक्याऐवजी या भागांची करा तपासणी, मिळू शकतो अधिक अजून निष्कर्ष

Coronavirus : थर्मल स्कॅनरने ताप मोजण्यासाठी डोक्याऐवजी या भागांची करा तपासणी, मिळू शकतो अधिक अजून निष्कर्ष

googlenewsNext
ठळक मुद्देफोरडेह थर्मामीटर किंवा स्कॅनर तापाची तपासणी करण्यासाठीचा सुलभ आणि लोकप्रिय पर्याय आहेमात्र ताप मोजण्याची ही योग्य पद्धत नसल्याचे सांगण्यात येत आहेतापमानामधील स्पाइक रेकॉर्ड करण्यासाठी तुमची बोटे आणि डोळे या अशा दोन जागा आहेत. जिथून तापाची तपासणी केली गेली पाहिजे

मुंबई - गेल्या सव्वा वर्षापासून सुरू असलेल्या कोरोना विषाणूच्या फैलावामुळे सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. (Coronavirus in India) त्यामुळे शरीरात कणकण जावणू लागल्यानंतर तपासणी करून घेण्याकडे कल वाढू लागला आहे. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग झाल्याचा संशय आल्यावर तुम्ही थर्मल स्कॅनरने डोक्याचे तापमान तपासत असाल तर थोडे थांबा. नव्याने समोर आलेल्या संशोधनामध्ये थर्मल स्कॅनरने कोरोनाच्या तापाची तपासणी करणे हा तपासणीचा योग्य पर्याय नसल्याचे समोर आले आहे.  (Check eyes & fingers instead of the head to measure the temperature with a thermal scanner, more results can be obtained  )
 
ताप हे कोरोनाच्या सर्वात प्रमुख लक्षणांपैकी एक लक्षण आहे. त्यासाठी फोरडेह थर्मामीटर किंवा स्कॅनर तापाची तपासणी करण्यासाठीचा सुलभ आणि लोकप्रिय पर्याय आहे. त्याच्या माध्यमातून गर्दीच्या ठिकाणींही आजारी व्यक्तीचा सहजपणे शोध घेता येऊ शकतो. तुम्ही पाहिलं असेल की, ऑफिस ट्रेन, मॉल, विमानतळ अशा ठिकाणी थर्मामीटरचा वापर कुठल्याही व्यक्तीच्या डोक्याच्या आणि मनगटाच्या तापमानाची तपासणी करण्यासाठी केला जातो. मात्र ताप मोजण्याची ही योग्य पद्धत नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्याऐवजी विषाणूच्या वाढत्या संसर्गामध्ये ताप मोजण्यासाठी शरीरातील दोन अन्य भागांची तपासणी करण्यााबत चर्चा सुरू आहे. 

इन्फ्रारेड गन्स, थर्मामीटर आणि स्कॅनर यांच्या माध्यमातून अंतर घटवतात. अनेक तज्ज्ञांनी फोरडेह थर्मामीटरसारख्या उपकरणाच्या रिझल्ट्सबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यामधून दाखवल्या जाणाऱ्या चुकीच्या निष्कर्षांवर टीका होत आहे. दुसरी बाब म्हणजे या उपकरणांचा वापर करताना चुकीचे अंतर असेल किंवा अनुपयुक्त वातावरणात त्याचा वापर केला तर चुकीचे निष्कर्ष येण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे तज्ज्ञ स्कॅनरचा वापर डोक्यावर नाही तर शरीरातील अन्य दोन भागांवर करून तापमान तपासण्याची गरज असल्याचे सांगतात. 

एक्सपिरिमेंटल फिजियोलॉजी या नियतकालिकामध्ये हल्लीच प्रसिद्ध झालेल्या एका लेखानुसार, तापमानामधील स्पाइक रेकॉर्ड करण्यासाठी तुमची बोटे आणि डोळे या अशा दोन जागा आहेत. जिथून तापाची तपासणी केली गेली पाहिजे. या जागांमधून ताप तपासण्यासाठीच्या अचूक तापमानाची माहिती मिळू शकते. या ठिकाणी केलेल्या तपासणीमधून चुकीचे निष्कर्ष मिळण्याची शक्यता कमी आहे. 

कपाळाच्या अगदी खाली असलेल्या डोळ्यांमझ्ये शरीरातील इतर कुठल्याही भागापेक्षा अधिक तापमानाची नोंद होत असते. तर दुसरीकडे बोटे ही शरीराच्या पेरीफेरल पाथवर असतात. त्यामुळे तिथेही योग्य तापमानाची नोंद होऊ शकते.  

Web Title: Coronavirus: Check eyes & fingers instead of the head to measure the temperature with a thermal scanner, more results can be obtained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.