Coronavirus : आता 14 नाही तर 28 दिवसांचे होम आयसोलेशन, 'या' सरकारने घेतला मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 11:59 AM2020-03-31T11:59:44+5:302020-03-31T12:17:57+5:30
Coronavirus : आरोग्य विभागाची एक विशेष टीम अलर्ट झाली आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या ही 1000 हून अधिक झाली असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
सुकमा - जगभरात कोरोनामुळे आतापर्यंत 37 हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर जगभरातील कोरोनाबधितांची संख्या 7 लाख 84 हजारांपर्यंत पोहोचली आहे. कोरोनामुळे अमेरिका, इटली, स्पेनसह इतर युरोपियन देशात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतातही कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या ही 1000 हून अधिक झाली असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोना संशयितांसंदर्भात छत्तीसगड सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.
छत्तीसगडमधील कोरोनाच्या संशयितांना आता 14 नाही तर 28 दिवसांच्या होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार आहे. सुकमा जिल्ह्यात तेलंगणाहून आलेल्या काही लोकांना ठेवण्यात आलं आहे. तर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी कोरोना संशयितांसाठी 100 बेड असलेले आयसोलेशन सेंटर तयार करण्यात आले आहेत. शेजारी राज्यांमध्ये कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहता सुकमा जिल्ह्यात आरोग्य विभागाची एक विशेष टीम अलर्ट झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
Coronavirus : हृदयद्रावक! चिमुकल्याचा मृतदेह हातात घेऊन बापाची 88 किमीची पायपीटhttps://t.co/AlirUd5SHH#coronavirusindia#CoronaLockdown
— Lokmat (@MiLOKMAT) March 31, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यानंतर आता छत्तीसगड सरकारने कोरोनाचा धोका लक्षात घेऊन कोरोना संशयितांना 14 ऐवजी 28 दिवसांच्या होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे. तेलंगणामध्ये कोरोनामुळे सोमवारी आणखी सहा जणांचा मृत्यू झाला. हे सर्वच्या सर्व कोरोना संक्रमित होते. गेल्या 13 ते 15 मार्चदरम्यान दिल्लीजवळील निजामुद्दीन येथे तब्लिगी मरकजमध्ये ते सहभागी झाले होते. याशिवाय दिल्लीत मरकजशी संबंधित आणखी 24 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समजते. याशिवाय 228 संशयित रुग्णांनाही दिल्लीतील दोन रुग्णालयांत भरती करण्यात आले आहे. यांचे रिपोर्ट येणे अद्याप बाकी आहे. अशाप्रकारे एकूण 252 जणांना वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.
#CoronaVirus : कोणत्या राज्यात किती कोरोनाचे रुग्ण?, पाहा एका क्लिकवर... https://t.co/6wDgnqg15w
— Lokmat (@MiLOKMAT) March 31, 2020
कोरोना व्हायसमुळे जगभरात हाहाकार माजला आहे. भारतात सुद्धा कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. देशात एकूण 1252 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर 49 विदेशी नागरिकांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. आतापर्यंत या जीवघेण्या व्हायरसमुळे 32 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण देशात 21 दिवसांचा लॉकडाउन सुरु आहे. तसेच, कोरोनावर आळा घालण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारडून विविध उपाययोजना सुरू आहेत. याशिवाय, विदेशात अडकलेल्या भारतीयांनी सुद्धा परत आण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : हृदयद्रावक! चिमुकल्याचा मृतदेह हातात घेऊन बापाची 88 किमीची पायपीट
Coronavirus : धक्कादायक! कोरोना संशयितांची माहिती दिली म्हणून तरुणाची हत्या
coronavirus : जगभरात कोरोनामुळे 37 हजार जण मृत्युमुखी, अमेरिका, इटलीमध्ये भीषण परिस्थिती
Coronavirus:...म्हणून पाक पंतप्रधान इमरान खान यांनी केला नरेंद्र मोदींचा उल्लेख; लॉकडाऊनचा विरोध
CoronaVirus : तीन दिवसांत तयार होणार १०० बेड असणारी 'कोरोना केअर ट्रेन'