CoronaVirus: लहान मुलांना तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका? केंद्राने दूर केले टेन्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 06:34 PM2021-05-24T18:34:23+5:302021-05-24T18:53:05+5:30
Children's not in high risk of Coronavirus Third Wave: कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी सर्वाधिक धोकादायक असणार अशी भीती व्यक्त केली जात आहे.
कोरोनाची तिसरी लाट (Corona third wave) लहान मुलांसाठी (Children's) सर्वाधिक धोकादायक असणार अशी भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, केंद्र सरकारचे म्हणणे याहून वेगळे आहे. एम्सचे डायरेक्टर रणदीप गुलेरिया यांनी याचे कोणतेही पुरावे नाहीत असे म्हटले आहे. (Children's will not in high infected Coronavirus Third Wave: AIIMS)
It has been said that children will be infected the most in the third wave but Pediatrics Association has said that this is not based on facts. It might not impact children so people should not fear: Dr Randeep Guleria, Director, AIIMS#COVID19pic.twitter.com/hsU0Kqh5gj
— ANI (@ANI) May 24, 2021
गुलेरिया म्हणाले की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाचे मुलांना कमी प्रमाणावर संक्रमण झाले आहे. यामुळे आतापर्यंत तरी असे वाटत आहे की, कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांना संक्रमित करणार नाही. अनेक संशोधकांनी लहान मुलांना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचे म्हटले आहे. मात्र, पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत लहान मुले कोरोनाने प्रभावित झालेली नाहीत. त्यांना लसही दिलेली नाही. यामुळे ते तिसऱ्या लाटेत सर्वाधिक संक्रमित होतील, याचे काही पुरावे मिळालेले नाहीत, असे गुलेरिया यांनी म्हटले आहे. यासाठी त्यांनी बालरोग तज्ज्ञांचे म्हणणे मांडले आहे.
Video: खूशखबर! रशियन Sputnik V चे भारतात उत्पादन सुरु; वर्षाला 10 कोटी डोस बनणार
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी सांगितले की, देशात गेल्या 17 दिवसांत पहिल्यांदाच कमी रुग्ण सापडले आहेत. 15 आठवड्यांत चाचण्यांमध्ये 2.6 पटींनी वाढ झाली आहे. तर संक्रमण दर हा कमालीचा घसरला आहे.
कोरोना संकटामुळे मुले आणि तरुणांवर झालेल्या परिणामवर बोलताना एम्सने म्हटले की, लहान मुलांना मानसिक तनाव, स्मार्टफोनची सवय आणि शैक्षणिक आव्हानांमधून अतिरिक्त नुकसान झाले आहे.