CoronaVirus: एका कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा; नागरी उड्डयन मंत्रालय सील

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 01:32 AM2020-04-23T01:32:39+5:302020-04-23T01:34:03+5:30

राजीव गांधी भवनस्थित नागरी उड्डयन मंत्रालयाचे मुख्यालय तीन दिवसांसाठी सील

CoronaVirus Civil Aviation Ministrys office sealed after employee tests positive | CoronaVirus: एका कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा; नागरी उड्डयन मंत्रालय सील

CoronaVirus: एका कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा; नागरी उड्डयन मंत्रालय सील

Next

नवी दिल्ली : नागरी उड्डयन मंत्रालयाच्या एका कर्मचाऱ्याला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर राजीव गांधी भवनस्थित नागरी उड्डयन मंत्रालयाचे मुख्यालय तीन दिवसांसाठी सील करण्यात आले आहे. कोरोनाची बाधा झालेला केंद्र सरकारच्या मंत्रालयाचा हा पहिला कर्मचारी आहे.
नागरी उड्डयन मंत्रालयाच्या टष्ट्वीटनुसार हा कर्मचारी १५ एप्रिल रोजी कार्यालयात आला होता. त्याची चाचणी करण्यात आली असता त्याला कोविड-१९ ची बाधा झाल्याचे २१ एप्रिल रोजीच्या चाचणी अहवालातून निष्पन्न झाले. नागरी उड्डयन मंत्रालयाच्या या कर्मचाºयाला कोरोनाची लागण झाल्याचे आढळल्यानंतर कार्यालयीन परिसरात आवश्यक नियमाचे काटेकोरपणे पालन करीत उपाय योजण्यात येत आहेत.

या कर्मचाºयाच्या संपर्कात आलेल्या अन्य कर्मचाऱ्यांना खबरदारीचा उपाय म्हणून स्वत:हून आयसोलेशनमध्ये राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
त्याच्या संपर्कातील लोकांचा शोध घेणे आणि संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने सर्वतोपरी पावले उचलली जात आहेत.

नागरी उड्डयनमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी टिष्ट्वटरवर म्हटले आहे की, कोरोनाबाधित या कर्मचाºयाच्या पाठीशी आम्ही आहोत. त्याला आवश्यक ती वैद्यकीय मदत दिली जात आहे. त्याच्या संपर्कातील अन्य कर्मचाºयांनी सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे.

Web Title: CoronaVirus Civil Aviation Ministrys office sealed after employee tests positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.