Coronavirus: पोलीस आणि मेडिकल टीमवर दगडफेक करणाऱ्यांनो...; योगी आदित्यनाथ कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 05:06 PM2020-04-15T17:06:53+5:302020-04-15T18:00:46+5:30

उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे मेडिकल टीम आणि पोलीस कर्मचाऱ्यांवर दगडफेक केल्याची घटना घडली होती.

Coronavirus: UP CM Yogi Aadityanath Reaction on incident of Policemen and Medical Team attack pnm | Coronavirus: पोलीस आणि मेडिकल टीमवर दगडफेक करणाऱ्यांनो...; योगी आदित्यनाथ कडाडले

Coronavirus: पोलीस आणि मेडिकल टीमवर दगडफेक करणाऱ्यांनो...; योगी आदित्यनाथ कडाडले

Next
ठळक मुद्देक्वारंटाईनमध्ये घेऊन जाणाऱ्या कुटुंबाला जमावाला रोखलेपोलीस आणि मेडिकल टीमच्या कर्मचाऱ्यांवर दगडफेक मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिला दोषींवर कारवाईचा इशारा

लखनऊ – देशात ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केली. त्यानंतर अनेक ठिकाणी स्थलांतरित मजुरांनी रस्त्यावर उतरून आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. लॉकडाऊन काळात काही ठिकाणी पोलीस आणि डॉक्टरांवर हल्ला होण्याच्या घटनाही थांबत नाहीत.

उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे मेडिकल टीम आणि पोलीस कर्मचाऱ्यांवर दगडफेक केल्याची घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, कोरोना संकटकाळात आरोग्य विभागाचे कर्मचारी, सफाई कामगार, सुरक्षा कर्मचारी आणि कायदा सुव्यवस्था सांभाळणारे पोलीस आपत्कालीन स्थितीत दिवसरात्र लोकांची सेवा करत आहेत. या लोकांवर हल्ला करणे ही घोडचूक आहे ती माफ करु शकत नाही. या घटनेची तीव्र निषेध त्यांनी यावेळी केला.

तसेच या कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या दोषींविरोधात आपत्कालीन नियंत्रण अधिनियम आणि राष्ट्रीय सुरक्षा अधिनियमातंर्गत कठोर कारवाई केली जाईल. त्याचसोबत त्यांच्याकडून करण्यात आलेल्या संपत्तीचं नुकसान भरपाईही सक्तीने वसूल करण्यात येईल. जिल्हा प्रशासनाने अशा समाजकंटकांना शोधून काढा. राज्यातील जनतेच्या सुरक्षेसाठी आवश्यक खबरदारी घ्या असे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले.

काय आहे प्रकरण?

सोमवारी रात्री तीर्थंकर मेडिकल युनिव्हर्सिटीत तबलीगी जमातमध्ये सहभागी झालेल्या ४९ वर्षीय कोरोनाबाधिताचा- मृत्यू झाला. त्यानंतर आरोग्य विभागातील पथक बुधवारी मृतकाच्या कुटुंबातील इतर सदस्यांना विलग ठेवण्यासाठी दाखल झाले. जेव्हा टीम कुटुंबातील सदस्यांना घेऊन जात होती, तेव्हा लोक आजूबाजूला जमले त्यांनी क्वारंटाईन सेंटरमध्ये जेवण दिलं जात नाही असं सांगत या लोकांना घेऊन जाण्यास विरोध केला. घटनास्थळी पोलिसांनी जमावाला समजवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर जमावाने दगडफेक सुरु केली. या दगडफेकीत रुग्णवाहिका आणि पोलिसांच्या दोन गाड्या फोडण्यात आल्या. तसेच एका डॉक्टरसह तीन पोलीस कर्मचारीही जखमी झाले.

दोषींवर कठोर कारवाई केली जाईल – एडीजी, कायदा व सुव्यवस्था

दरम्यान, कायदा व सुव्यवस्थेचे एडीजी पीव्ही रामाशास्त्री यांनी सांगितले की, डीएम आणि एसएसपी घटनास्थळी दाखल झाले होते. घडलेली घटना निषेधार्ह असून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. समाज पूर्णपणे सहकार्य करीत आहे, परंतु काही लोक अफवाच्या जाळ्यात फसून अशाप्रकारे कृत्य करत आहेत. आरोपींची ओळख पटविली जाईल व त्यांच्यावर रासुका अंतर्गत कारवाई केली जाईल अशी माहिती त्यांनी दिली.

Web Title: Coronavirus: UP CM Yogi Aadityanath Reaction on incident of Policemen and Medical Team attack pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.