CoronaVirus: योगी आदित्यनाथ मैदानात; १० दिवसांत ११ ठिकाणी दौरे, परिस्थितीचा घेतला आढावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 10:39 AM2021-05-17T10:39:34+5:302021-05-17T10:40:45+5:30

CoronaVirus: कोरोनामुक्त झाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी १० दिवसांत ११ ठिकाणी भेटी दिल्याची माहिती मिळाली आहे.

coronavirus cm yogi adityanath active ground zero district visit | CoronaVirus: योगी आदित्यनाथ मैदानात; १० दिवसांत ११ ठिकाणी दौरे, परिस्थितीचा घेतला आढावा

CoronaVirus: योगी आदित्यनाथ मैदानात; १० दिवसांत ११ ठिकाणी दौरे, परिस्थितीचा घेतला आढावा

Next
ठळक मुद्देयोगी आदित्यनाथ मैदानात१० दिवसांत ११ ठिकाणी दौरेकोरोना परिस्थितीचा घेतला आढावा

लखनऊ: गेल्या काही दिवसांपासून भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. कोरोनाबाधित आणि कोरोनामुळे होणारे मृत्यू दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहेत. कोरोनाच्या वाढत्या उद्रेकामुळे कोरोना लस, ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड्स यांचा तुटवडा जाणवत आहे. उत्तर प्रदेशातही परिस्थिती बिकट होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनामुक्त झाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी १० दिवसांत ११ ठिकाणी भेटी दिल्याची माहिती मिळाली आहे. (coronavirus cm yogi adityanath active ground zero district visit)

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ स्वतः मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी योगी आदित्यनाथ यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र, आता कोरोनामुक्त झाल्यानंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी योगी आदित्यनाथ थेट गावांना भेटी देत असून, कोरोना रुग्ण, उपचार, उपलब्ध साधने यांची माहिती करून घेत आहेत. गेल्या १० दिवसांत ११ मंडल आणि जिल्ह्यांना योगी आदित्यनाथ यांनी भेटी दिल्याची माहिती मिळाली आहे. 

दिल्लीत पुन्हा लॉकडाऊन वाढवला, २४ मेपर्यंत निर्बंध कायम; केजरीवालांची घोषणा

अनेक भागांत कोरोनाचा उद्रेक

उत्तर प्रदेशातील अनेक प्रमुख शहरे, जिल्ह्यांत कोरोनाचा उद्रेक झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे उत्तर प्रदेशातील कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसेच अनेक ठिकाणी सुविधा, ऑक्सिजन, बेड्स, व्हेंटिलेटर्स, रेमडेसिवीर यांचा तुटवडा जाणवत असल्याचे सांगितले जात आहे. उत्तर प्रदेशातील आरोग्य व्यवस्थेवर विरोधकांसह केंद्रीयमंत्र्यांनीही नाराजी व्यक्त केली होती. म्हणूनच आता योगी आदित्यनाथ ग्राऊंड रिपोर्टचा आढावा घेण्यासाठी दौरे करत असल्याचे म्हटले जात आहे. 

मिशन ऑक्सिजन! आतापर्यंत १३९ रेल्वेतून तब्बल ८,७०० मेट्रिक टन ऑक्सिजन वाहतूक

समस्यांवर उपाय करण्याला प्राधान्य

कोरोनाच्या परिस्थितीत ज्या काही समस्या जाणवत आहे, त्यावर उपाय करण्याला योगी आदित्यनाथ प्राधान्य दिले जात असल्याचे सांगितले जात आहे. मुरादाबाद, बरेली, वाराणसी, गोरखपूर, अयोध्या, बस्ती, अलीगड, आगरा, मथुरा आणि मेरठ या ठिकाणी योगी आदित्यनाथ यांनी भेटी दिल्या असून, कोरोना लसीकरण केंद्रातील स्थितीचाही आढावा घेतला, असे सांगितले जात आगे. 

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत २ लाख ८१ हजार ३८६ नवीन कोरोनाबाधित आढळून आले असून, ३ लाख ७८ हजार ७४१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर, याच कालावधीत ४ हजार १०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत १८ कोटी २९ लाख २६ हजार ४६० जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. 
 

Web Title: coronavirus cm yogi adityanath active ground zero district visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.