Coronavirusची धास्ती, Cognizantकडून ऑफिस बंद, कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याच्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2020 03:37 PM2020-03-05T15:37:12+5:302020-03-05T15:46:46+5:30
Coronavirus : हैदराबादमध्ये Cognizant कंपनीचे ऑफिस आयटी पार्क रहेजा माइंड स्पेसच्या बिल्डिंग 20 मध्ये आहे.
नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसचा कहर सुरू आहे. भारतातही या व्हायरसने शिरकाव केला आहे. त्यामुळे कॉर्पोरेट कंपन्यांनी जास्त सतर्कता बाळगण्यास सुरुवात केली आहे. आयटी सर्व्हिस कंपनी कॉग्निझंटने (Cognizant India) हैदराबादमधील आपले ऑफिस तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्यास कंपनीने सांगितले आहे.
हैदराबादमध्ये Cognizant कंपनीचे ऑफिस आयटी पार्क रहेजा माइंड स्पेसच्या बिल्डिंग 20 मध्ये आहे. याच बिल्डिंगमधील आणखी एका कंपनीच्या एका कर्मचाऱ्याला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे समोर आले. त्यामुळे Cognizant कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना एका ई-मेलद्वारे ऑफिस बंद करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. तसेच, ऑफिस बंद करून निर्जंतुकीकरण आणि स्वच्छता करण्याचे कंपनीने म्हटले आहे.
Cognizant ने ई-मेलमध्ये म्हटले आहे की, "रहेजा माइंड स्पेसमधील बिल्डिंग 20 मध्ये असलेल्या एका कंपनीच्या ऑफिसमधील एक कर्मचारी कोविड-19 च्या टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे सतर्कता म्हणून आम्ही बिल्डिंग 20 मधील ऑफिस बंद करत आहोत. या ऑफिसचे निर्जंतुकीकरण आणि स्वच्छता केली जाईल." याचबरोबर, Cognizant कंपनीने स्पष्ट केले आहे की, आमच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला कोरोना व्हायरसची लागण झाली नाही. तसेच, सर्व कर्माचाऱ्यांना घरातून काम करण्याच्या सूचना कंपनीने दिला आहे.
दरम्यान, जगभरात सध्या कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतातही काही संशयित कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोना व्हायरससंबंधी सर्व प्रकरणावर लक्ष ठेवण्याचे काम केंद्र सरकारकडून सुरू आहे. देशात आतापर्यंत 29 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे समोर आले आहे. विदेशातून आलेल्या लोकांना कोरोना व्हायरसचे संक्रमण झाले आहे, असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले.
आणखी बातम्या..
भारतीय तट रक्षक दलाच्या ताफ्यात आता लवकरच 60 नवीन गस्ती नौका
कोरोनाची अशीही दहशत; चीनच्या सलून्समध्ये लाँग डिस्टन्स हेअर कट
निर्भयाच्या दोषींना 20 मार्चला फासावर लटकवणार, नव्याने डेथ वॉरंट जारी
कोरोनापासून बचाव करायचाय? मग 'या' गोष्टी नक्की ठेवा सोबत