देशातील 'या' राज्यात कोरोना अन् झिकाचाही कहर! 17-18 जुलैला संपूर्ण लॉकडाउन; बँकाही राहणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 09:05 AM2021-07-14T09:05:04+5:302021-07-14T09:08:40+5:30

केरळमध्ये बँकांना आठवड्यातून पाच दिवस कामकाजाची परवानगी आहे. त्यामुळे, संपूर्ण लॉकडाऊनदरम्यान बँकाही बंदच राहतील. याच बरबोर आता झिका व्हायरसमुळेही केरळात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

CoronaVirus Complete lockdown in kerala on 17th and 18th july state government issued an order yesterday | देशातील 'या' राज्यात कोरोना अन् झिकाचाही कहर! 17-18 जुलैला संपूर्ण लॉकडाउन; बँकाही राहणार बंद

देशातील 'या' राज्यात कोरोना अन् झिकाचाही कहर! 17-18 जुलैला संपूर्ण लॉकडाउन; बँकाही राहणार बंद

Next

देशात कोरोनाचा वेग मंदावल्याचे चित्र आहे. मात्र, दक्षीण भारतातून रोजच्या रोज समोर येणारे कोरोनाचे आकडे अजूनही भयभीत करणारे आहेत. केरळमध्ये सातत्याने वाढत असलेल्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर राज्‍य सरकारने 17 आणि 18 जुलैला तेथे संपूर्ण लॉकडाउनची घोषणा केली आहे. याच बरोबर राज्‍य सरकार 15 जुलैपासून कोरोनाची नवी गाइडलाइनदेखील जारी करू शकते. (CoronaVirus Complete lockdown in kerala on 17th and 18th july state government issued an order yesterday)

केरळमध्ये बँकांना आठवड्यातून पाच दिवस कामकाजाची परवानगी आहे. त्यामुळे, संपूर्ण लॉकडाऊनदरम्यान बँकाही बंदच राहतील. याच बरबोर आता झिका व्हायरसमुळेही केरळात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात मंगळवारी झिका व्हायरसचे आणखी तीन रुग्ण समोर आले आहेत. यामुळे आता एकूण रुग्णांची संख्या 18 वर पोहोचली आहे. तीन नव्या रुग्णांत एका मुलाचाही समावेश आहे. केरळमधील आरोग्यमंत्री वीना जॉर्ज यांनी म्हटले आहे, की एक 22 महिन्यांचा मुलगा, एक 46 वर्षीय व्यक्ती आणि एका 29 वर्षीय आरोग्य कर्मचाऱ्याला संक्रमण झाल्याचे आढळून आले आहे. 

Coronavirus: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला हवामानाचा अंदाज समजू नका, बेफिकीर लोकांना केंद्राचा गंभीर इशारा

केरळात मंगळवारी कोरोनामुळे 124 जणांचा मृत्यू -
केरळात मंगळवारी कोविड-19चे 14,539 नवे रुग्ण समोर आले आहेत. यानंतर, एकूण संक्रमितांची संख्या वाढून 30,87,673 वर पोहोचली आहे. तसेच, गेल्या 24 तासांत 124 रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा वाढून आता 14,810 वर पोहोचला आहे.

आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी एका निवेदनात म्हटले आहे, की मलापुरममध्ये सर्वाधिक 2,115 रुग्ण समोर आले आहेत. यानंतर एर्नाकुलममध्ये 1,624 आणि कोल्लम येथे 1,404 रुग्ण समोर आले आहेत. निवेदनात दिलेल्या माहितीनसार, मंगळवारी 10,331 रुग्ण संक्रमणमुक्तदेखील झाले आहेत. यानंतर एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या वाढून आता 29,57,201 वर पोहोचली आहे. तर राज्यात 1,15,174 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
 

Web Title: CoronaVirus Complete lockdown in kerala on 17th and 18th july state government issued an order yesterday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.