Coronavirus : वेळेत उपाय योजल्यामुळेच भारतात कोरोना आटोक्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 07:13 AM2020-03-18T07:13:03+5:302020-03-18T07:13:51+5:30
चीन, इटली, अमेरिका, इराण, स्पेन आदी देशांत कोरोनाचा कहर सुरू असताना भारतातील परिस्थिती मात्र बऱ्यापैकी नियंत्रणात आहे.
नवी दिल्ली : देशातील कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या १३८ झाली असून, सरकारी यंत्रणांनी वेळेत पावले उचलल्यामुळेच अन्य देशांप्रमाणे भारतात रुग्ण वाढले नाहीत आणि बळींची संख्याही आतापर्यंत तीनच राहिली आहे.
चीन, इटली, अमेरिका, इराण, स्पेन आदी देशांत कोरोनाचा कहर सुरू असताना भारतातील परिस्थिती मात्र बऱ्यापैकी नियंत्रणात आहे. त्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनेही समाधान व्यक्त केले आहे.
मंत्रीच बंदिस्त
परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी स्वत:ला घरात स्वत:ला बंदिस्त करून घेतले आहे. एका रुग्णालयात कोरोनाची लागण झालेल्या एका डॉक्टरशी त्यांची १५ मार्च रोजी भेट झाली होती. त्यानंतर, त्यांनी स्वत:ची वैद्यकीय तपासणी केली. त्यात अहवाल निगेटिव्ह आला असला, तरी त्यांनी कोणाशीही संपर्क न करण्याचा निर्णय घेतला.