Coronavirus: कोरोना हे चीनचेच षड्यंत्र, तिसरे महायुद्ध म्हणूनच लढावे लागणार, अरुण फिरोदिया यांचं मत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 06:14 AM2021-05-23T06:14:25+5:302021-05-23T06:15:56+5:30
Coronavirus News: कोणाला ही कॉन्स्पिरसी थेअरी वाटेल, परंतु कोविड-१९ विषाणू हा चीनच्या प्रयोगशाळेतच तयार झाला आहे.
पुणे : कोरोना विषाणूचा प्रसार हे चीनचेच षड् यंत्र आहे. त्यामुळे भारताने हे तिसरे महायुद्ध म्हणूनच लढायला हवे. यासाठी देशभर मजबूत आरोग्य यंत्रणा उभी करतानाच संपूर्ण देशाचे लसीकरण करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे आवाहन ज्येष्ठ उद्योगपती अरुण फिरोदिया यांनी केले आहे.
फिरोदिया म्हणाले की, कोणाला ही कॉन्स्पिरसी थेअरी वाटेल, परंतु कोविड-१९ विषाणू हा चीनच्या प्रयोगशाळेतच तयार झाला आहे.
चीनमधील गुंतवणूक येत राहिली. जगाचा हा कचखाऊ प्रतिसाद पाहून चीनचे धाडस वाढले. त्यामुळे त्यांनी विषाणूचा दुसरा व्हेरिएंट तयार केला. त्यालाच आता भारतीय व्हेरिएंट म्हटले जाऊ लागले आहे. आता त्यांनी तिसरा व्हेरिएंट बनविला आहे. लहान मुलांसाठी तो घातक ठरणार आहे. जगातील कोट्यवधी लोक या विषाणूने मृत्युमुखी पडत असतानाही कोणत्याही देशाचे धाडस नाही की चीनसोबतचा व्यापार बंद करावा किंवा कमी करावा.
तरीही चीनसोबत व्यापार सुरूच ठेवला
वुहान येथील प्रयोगशाळेत चीनने हा विषाणू तयार केला आणि त्याबरोबरच त्याविरुध्दची लसही विकसित केली. जगातून यावर काय प्रतिक्रिया येते याचा अंदाज घेतला. परंतु, भारतासह जगातील इतर देशांनी चीनबरोबरचा व्यापार सुरूच ठेवला.