Coronavirus: चिंताजनक! भारतातील कोरोना मृतांचा आकडा तीन लाखांवर, अमेरिका आणि ब्राझीलनंतर सर्वाधिक मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 08:39 AM2021-05-24T08:39:25+5:302021-05-24T08:40:06+5:30

Coronavirus in India: देशात मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या आता ३,००,३१२ झाली आहे. अमेरिकेत आतापर्यंत कोरोनाने ६ लाखांवर लोकांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलमध्ये आतापर्यंत कोरोनाने ४.४८ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.

Coronavirus: Corona death toll in India rises to three lakh | Coronavirus: चिंताजनक! भारतातील कोरोना मृतांचा आकडा तीन लाखांवर, अमेरिका आणि ब्राझीलनंतर सर्वाधिक मृत्यू

Coronavirus: चिंताजनक! भारतातील कोरोना मृतांचा आकडा तीन लाखांवर, अमेरिका आणि ब्राझीलनंतर सर्वाधिक मृत्यू

Next

नवी दिल्ली : अमेरिका आणि ब्राझीलनंतर आता भारतात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या तीन लाखांवर गेली आहे. भारतात कोरोनाचे सर्वाधिक बळी दुसऱ्या लाटेत गेले आहेत. गत दोन महिन्यांत ही संख्या वाढली आहे.
देशात मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या आता ३,००,३१२ झाली आहे. अमेरिकेत आतापर्यंत कोरोनाने ६ लाखांवर लोकांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलमध्ये आतापर्यंत कोरोनाने ४.४८ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यापाठोपाठ मेक्सिकोत २.२१ लाख, इंग्लंड १.२७ लाख, इटली १.२५ लाख, रशिया १.१८ लाख आणि फ्रान्समध्ये १.०८ लाख लोकांचा कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यू झाला आहे.
अन्य देशांच्या तुलनेत भारताचा मृत्यूदर कमी आहे. इटली २.९९ टक्के, इंग्लंड २.८७ टक्के, ब्राझील २.७९ टक्के, जर्मनी २.३९ टक्के, रशिया २.३५ टक्के, स्पेन २.१९ टक्के, फ्रान्स १.८५ टक्के, अमेरिका १.७८ टक्के, भारत १.१२ टक्के आणि तुर्कीचा मृत्यूदर ०.८८ टक्के आहे. सध्या देशात दर १०० रुग्णांमागे एका रुग्णाचा मृत्यू होत आहे. भारतात कोरोनाचे सर्वाधिक बळी दुसऱ्या लाटेत गेले आहेत. 

सातव्या दिवशीही रुग्णसंख्या ३ लाखांच्या आत
नवी दिल्ली : देशात रविवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत कोरोनाच्या नव्या दोन लाख ४० हजार ८४२ रुग्णांची नोंद झाली तर ३,७४१ जणांचा मृत्यू झाला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निवेदनाद्वारे दिलेल्या माहितीनुसार रविवारी सलग सातव्या दिवशी रुग्ण तीन लाखांच्या खाली आले आहेत. देशात एकूण मृतांची संख्या २,९९,२६६ तर एकूण रुग्णांची संख्या २,६५,३०,१३२ झाली आहे. सध्या देशात २८ लाख ५ हजार ३९९ रुग्णांवर उपचार सुरू असून एकूण बाधितांच्या संख्येत ही टक्केवारी १०.५७ तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.३० टक्के आहे. दोन कोटी ३४ लाख २५ हजार ४६७ जण बरे झाले असून मृत्यूदर १.१३ टक्के आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने दिलेल्या माहितीनुसार २२ मेपर्यंत ३२ कोटी ८६ लाख ७ हजार ९३७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यात शनिवारी तपासलेल्या २१ लाख २३ हजार ७८२ नमुन्यांचाही समावेश आहे.

Web Title: Coronavirus: Corona death toll in India rises to three lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.