coronavirus: भारतात कोरोनाच्या फैलावाने सर्वोच्च पातळी गाठलीय? एम्सच्या संचालकांनी दिली अशी माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 09:14 AM2020-07-21T09:14:57+5:302020-07-21T09:33:02+5:30
देशात दररोज सापडणाऱ्या कोरोनाच्या रुग्णसंख्येने ४० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे देशात समूह संसर्गास सुरुवात झाली आहे का किंवा भारतात कोरोनाच्या साथीने आपली सर्वोच्च पातळी गाठली आहे का, याबाबतच्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
नवी दिल्ली - देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर गेल्या काही दिवसांत देशभरात कोरोनाचे रुग्ण सापडण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. तसेच देशात दररोज सापडणाऱ्या कोरोनाच्या रुग्णसंख्येने ४० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे देशात समूह संसर्गास सुरुवात झाली आहे का किंवा भारतात कोरोनाच्या साथीने आपली सर्वोच्च पातळी गाठली आहे का, याबाबतच्या चर्चेला सुरुवात झाली आहे. दरम्यान, एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी भारतातील कोरोनाच्या सध्याच्या स्थितीबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
देशातील कोरोनाच्या सद्यस्थितीबाबत भाष्य करताना रणदीप गुलेरिया म्हणाले की, देशातील काही भागात कोरोनाने आपलं सर्वोच्च शिखर गाठले आहे असे सध्याच्या परिस्थितीवरून आपण म्हणू शकतो. मुंबई आणि अहमदाबादमध्ये कोरोनाची सर्वोच्च पातळी येऊन गेल्याची शक्यता आहे. दिल्ली, मध्य मुंबई आणि अहमदाबाद या शहरांमध्ये कोरोनाने सर्वोच्च शिखर गाठल्यानंतर येथील साथीचा आलेख आता काहीसा खाली येऊ लागला आहे. तसेच देशातील इतर भागातही कोरोनाने सर्वोच्च पातळी गाठून झाली असण्याची शक्यता आहे. तर काही राज्यांमध्ये आताच कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहेत, अशा राज्यांमध्ये कोरोनाचा सर्वोच्च स्तर काहीसा उशिरा येण्याची शक्यता आहे.
Certain areas have hit their peak. Delhi seems to have done so because the cases have declined significantly. Certain areas have yet to reach the peak. Cases are increasing in certain states. They will reach the peak a little later: AIIMS Director Randeep Guleria #COVID19https://t.co/VTwU3jIO9j
— ANI (@ANI) July 20, 2020
दरम्यान, इतर देशांच्या तुलनेत भारतासोबतच मध्य आशियाई देशांमध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमी आहे. कोरोनामुळे जे इटली आणि स्पेनमध्ये घडले, तसेच जे अमेरिकेत घडत आहे, ते भारतात घडलेले नाही, असेही गुलेरिया यांनी सांगितले. भारतीयांमध्ये कोरोनाशी लढण्याची प्रतिकारशक्ती आपोआप तयार झाली असावी, ज्यामुळे कोरोनामुळे होणारा मृत्यूदर भारतात कमी झाला असावा, अशी शक्यता त्यांनी वर्तवली.
कोरोनाविरोधात विकसित होत असलेल्या लसीबाबत भाष्य करताना गुलेरिया म्हणाले की, कोरोनाविरोधात विकसित होणारी लस आपल्याला कोरोनाच्या संसर्गापासून एक ते दोन वर्षांपर्यंत संरक्षण देऊ शकते. मात्र ही लस सर्वात आधी कुणाला द्यायची, याबाबतचा प्राधान्यक्रम आपल्याला ठरवावा लागेल. वृद्ध व्यक्ती, तसेच इतर गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तींना कोरोनाची लस आधी दिली गेली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी
coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल
भारतानंतर आता या देशाने चीनला दाखवली सैनिकी तादक, घुसखोरीला चोख प्रत्युत्तर देण्याचा दिला इशारा
महिंद्रांनी सुरक्षा दलांसाठी आणले दणकट चिलखती अस्र; आता माओवादी, दहशतवाद्यांची खैर नाही
…म्हणून भारतातील दहा पैकी तीन कोरोना रुग्ण करू शकत नाहीत प्लाझ्मा दान
coronavirus: कोरोनाबाधित रुग्णाचे तब्बल दीड कोटींचे बिल केले माफ, तिकीट देऊन केली मायदेशी पाठवणी