coronavirus: कोरोनाचा संसर्ग बळावला, भारतातील हे शहर कोरोनाचा ग्लोबल हॉटस्पॉट होण्याच्या मार्गावर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 12:34 PM2020-06-25T12:34:08+5:302020-06-25T12:39:31+5:30
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये या महिन्याच्या सुरुवातीपासूनच कोरोनामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे.
नवी दिल्ली - देशातील कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस अधिकाधिक वाढत आहेत. त्यातही देशातील काही प्रमुख शहरांमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव हा नियंत्रणाबाहेर जात असल्याची चिन्हे दिसत आहेत. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये या महिन्याच्या सुरुवातीपासूनच कोरोनामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली असून, मंगळवारी दिल्लीमध्ये जगातील कुठल्याही अन्य शहरापेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली.
दिल्लीमध्ये मंगळवारी कोरोनाच्या ३ हजार ९४७ नव्या रुग्णांची नोंद झाली. देशातील कुठल्याही शहरात एका दिवसात सापडलेले हे सर्वाधिक रुग्ण आहेत. तसेच मंगळवारी दिल्ली हे महाराष्ट्र आणि तामिळनाडूला मागे टाकत एका दिवसात सर्वाधिक रुग्णांची नोंद झालेले राज्य ठरले. तसेच देशात कोरोनाचा फैलाव सुरू झाल्यापासून एका दिवसात कुठल्याही राज्यात सापडलेली ही सर्वाधिक रुग्णसंख्या ठरली आहे.
२३ जून रोजी दिल्लीमध्ये साओ पावलो (ब्राझील), सँटियागो (चिली), लीमा (पेरू) पेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाली. मात्र दक्षिण अमेरिकेतील ही तिन्ही मोठी शहरे अद्यापही कोरोनाचे ग्लोबल हॉटस्पॉट ठरलेली आहेत. तसेच २३ जून रोजी दिल्लीत न्यूयॉर्क सिटी आणि मॉस्कोपेक्षाही अधिक रुग्णांची नोंद झाली. न्यूयॉर्क आणि मॉस्कोमध्येही सध्या कोरोनाचे हजारो नवे रुग्ण सापडत आहेत. मात्र या आकडेवारीत सातत्याने घट होत आहे.
मात्र दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णसंख्या असलेल्या शहरांच्या तुलनेत दिल्लीतील रुग्णसंख्या कमी आहे. जगाचा विचार केल्यास सँटियागो शहरामध्ये सध्या कोरोनाचे दोन लाख रुग्ण सापडले आहे. मॉस्को आणि न्यूयॉर्क सिटी या शहरांमध्येही रुग्णसंख्या अधिक आहे. मात्र येथील कोरोनाच्या रुग्णवाढीचे प्रमाण आता मंदावले आहे.
तसेच लोकसंख्येच्या तुलनेत कोरोनाच्या रुग्णसंख्येचा विचार केल्यास दिल्ली अजूनही ग्लोबल हॉटस्पॉटपेक्षा खूप कमी रुग्ण आहेत. दिल्लीमध्ये दर दहा लाख लोकसंख्येमागे ३४७ रुग्ण सापडले आहेत. तर सँटियागो या शहरात दर दला लाख लोकांमागे २८ हजार रुग्ण सापडले आहेत. तर भारताचा विचार केल्यास मुंबईमध्ये दर दहा लाख लोकांमागे ५ हजार ४७८ आणि चेन्नईमध्ये दर दहा लाख लोकांमागे ६ हजार २२६ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत.
तसेच जगातील कोरोना हॉटस्पॉट असलेल्या शहरांच्या तुलनेत दिल्लीमध्ये झालेल्या मृत्यूंचे प्रमाणही कमी आहे. दिल्लीत आतापर्यंत २ हजार ३०१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर न्यूयॉर्कमध्ये दिल्लीपेक्षा आठपट अधिका लोकांचा मृत्यू झाला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
योगगुरू ते उद्योगगुरू! एकेकाळी सायकलवरून विकायचे च्यवनप्राश, आता करतात अब्जावधीची उलाढाल
coronavirus: वृद्ध आणि आजारी व्यक्तींनंतर आता कोरोना करतोय तरुणांना टार्गेट, तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
coronavirus: कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींना भविष्यात करावा लागू शकतो या समस्यांचा सामना
गलवानमध्ये किती सैनिक मारले गेले, सरकारच्या मौनामुळे चिनी नागरिक संतापले
मंगळ ग्रहावरील वस्तीत राहतील किती माणसं? अखेर मिळालं मोठ्या प्रश्नाचं उत्तर
कर्नल धारातीर्थी पडताच बिहार रेजिमेंटचे जवान भडकले, १८ जणांच्या माना मोडत चिन्यांना झोडपले
भारतच नाही एकूण २३ देशांच्या भूमीवर दावा, असे आहे चीनचे विस्तारवादी धोरण....
ती संधी साधली आणि चीन अमेरिकेला आव्हान देणारी महासत्ता बनली