coronavirus: कोरोना वाढतोय, लॉकडाऊनची शक्यता, रेल्वेसेवाही बंद होणार? रेल्वे प्रशासनाचं मोठं विधान...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 02:04 PM2021-04-14T14:04:32+5:302021-04-14T14:07:42+5:30

Indian Railway News : महाराष्ट्रामध्ये १५ दिवसांसाठी कठोर निर्बंध लागू झाल्यानंतर आता देशपातळीवरही लॉकडाऊनची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच देशभरातील रेल्वे वाहतुकीवरही निर्बंध येऊन रेल्वेसेवा बंद करण्यात येणार असल्याचे शक्यता वर्तवली जात आहे.

coronavirus: Corona is on the rise, possibility of lockdown, train service will be closed? Railway administration's big statement ... | coronavirus: कोरोना वाढतोय, लॉकडाऊनची शक्यता, रेल्वेसेवाही बंद होणार? रेल्वे प्रशासनाचं मोठं विधान...

coronavirus: कोरोना वाढतोय, लॉकडाऊनची शक्यता, रेल्वेसेवाही बंद होणार? रेल्वे प्रशासनाचं मोठं विधान...

Next
ठळक मुद्देप्रवाशांनो कृपया लक्ष द्या, गोंधळून गडबडून जाऊ नका, रेल्वे गाड्या नियमितपणे धावत राहतीलसमर स्पेशल ट्रेन चालवण्यात येत आहेत. तसेच प्रवाशांना सूचित करण्यात येते की, लांब पल्ल्याच्या घोषित नियमित आणि विशेष गाड्याही धावत राहतीलया सर्व विशेष गाड्यांमध्ये कोविड-१९ च्या नियमांचे आणि निर्बंधांचे पालन करण्याच्या दृष्टीने कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवासांनाच ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील विविध भागात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. (coronavirus in India) त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी विविध ठिकाणी निर्बंध लागू करण्यात येऊ लागले आहे. महाराष्ट्रामध्ये १५ दिवसांसाठी कठोर निर्बंध लागू झाल्यानंतर आता देशपातळीवरही लॉकडाऊनची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (lockdown in India) तसेच देशभरातील रेल्वे वाहतुकीवरही निर्बंध येऊन रेल्वेसेवा बंद करण्यात येणार असल्याचे शक्यता वर्तवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने आता याबाबत सूचक विधान केले आहे.  मध्य रेल्वेने या संदर्भात ट्वीट करत लांब पल्ल्याच्या नियमित आणि स्पेशल रेल्वे गाड्या वेळापत्रानुसार धावत राहतील, असे सांगितले आहे.  ( Corona is on the rise, possibility of lockdown, train service will be closed? Railway administration's big statement ...)

या ट्वीटमध्ये मध्य रेल्वेच्या प्रशासनाने म्हटले आहे की, प्रवाशांनो कृपया लक्ष द्या, गोंधळून गडबडून जाऊ नका, रेल्वे गाड्या नियमितपणे धावत राहतील. तर रेल्वे बोर्डाकडूनही याबाबत माहिती देण्यात आली आहे. समर स्पेशल ट्रेन चालवण्यात येत आहेत. तसेच प्रवाशांना सूचित करण्यात येते की, लांब पल्ल्याच्या घोषित नियमित आणि विशेष गाड्याही धावत राहतील. या सर्व विशेष गाड्यांमध्ये कोविड-१९ च्या नियमांचे आणि निर्बंधांचे पालन करण्याच्या दृष्टीने कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवासांनाच ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल.  

दरम्यान, सध्याच्या परिस्थितीत प्रवाशांनी गोंधळून जाऊ नये. प्रवाशांना आवाहन आहे की, त्यांनी रेल्वे स्टेशनवर गर्दी करू नये. केवळ ९० मिनिटे आधीच रेल्वे स्टेशनवर पोहोचावे. रेल्वे वेटिंग लिस्टवर नजर ठेवून आहे. आवश्यकता भासेल त्या प्रमाणे अतिरिक्त स्पेशल ट्रेन चालवण्यात येईल.  

कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे महाराष्ट्रात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. संपूर्ण लॉकडाऊन होण्याच्या भीतीने बरेच लोक गावाच्या दिशेने जात आहेत. त्यामुळे रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने लोकांना गडबडून न जाण्याचे आवाहन केले आहे.  

Read in English

Web Title: coronavirus: Corona is on the rise, possibility of lockdown, train service will be closed? Railway administration's big statement ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.