Coronavirus : ...म्हणून भारतात मेच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत राहणार कोरोनाचा प्रभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 08:36 AM2020-04-18T08:36:26+5:302020-04-18T08:44:56+5:30

एका अभ्यासानुसार, मेच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार होणार आहे.

Coronavirus : corona virus will continue to be strong in india till the third week of may vrd | Coronavirus : ...म्हणून भारतात मेच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत राहणार कोरोनाचा प्रभाव

Coronavirus : ...म्हणून भारतात मेच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत राहणार कोरोनाचा प्रभाव

googlenewsNext

नवी दिल्लीः जगभरात कोरोनानं हाहाकार माजवला आहे. भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक भर पडत चालली आहे. परंतु काही दिवसांपासून जगभरात पसरलेल्या या कोरोनाचा प्रभाव हळूहळू कमी होऊ लागला आहे. एका अभ्यासानुसार, मेच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार होणार आहे. पण लोकांनी लॉकडाऊनचं योग्य पालन केल्यास मेच्या तिसऱ्या आठवड्यापासून याचा प्रभाव हळूहळू कमी होऊ शकतो.

टाइम्स फॅक्ट-इंडिया आऊटब्रेक रिपोर्टनुसार, भारतातल्या कोरोना विषाणूवर अभ्यास करण्यात आला असून, यात भारतात असलेल्या कोरोनासंदर्भात माहिती मिळाली आहे. हा अभ्यास ग्लोबल कन्सल्टिंग फर्म प्रोटिव्हिटी आणि टाइम्स नेटवर्कनं केला आहे. १६ एप्रिलच्या या रिपोर्टमध्ये, कोरोना भारतात कशा पद्धतीनं पसरतो आहे आणि त्याचा उद्रेक कधी होणार आहे, याबाबत माहिती देण्यात आली आहे. ८ राज्यं आणि देशातील टॉप ३ हॉटस्पॉटमधून मिळालेल्या डेटाच्या आधारावर हा रिपोर्ट तयार करण्यात आला आहे. यात केंद्राकडून येणारे आकडे, सरकारी बुलेटिन आणि आरोग्य मंत्रालयाच्या माहितीचाही वापर करण्यात आला आहे. कोरोनाची आकडेवारी दररोज बदलत असल्यानं रुग्णांमध्ये घसरण होऊ शकतं, असंही यात सांगण्यात आलं आहे.


   
सावधगिरी बाळगल्यास प्रकरणं होतील कमी
या उपक्रमातील डेटा आणि विश्लेषक शाखेचे संचालक ध्रुवज्योती घोष म्हणाले की, आम्ही अभ्यासामध्ये अवलंबिलेली सर्व मॉडेल्स एकमेकांशी जोडून पाहिली आणि डेटा सादर केला. अभ्यासात तीन मॉडेल्स अवलंबली गेली.  SEIR मॉडल आणि टाइम सीरीजच्या दोन मॉडलचा यात समावेश आहे. सेअर म्हणजे संवेदनाक्षम (अत्यंत संवेदनशील), Exposed  (उघड), Infectious ((संसर्गजन्य), Recovered (बरे), असंही त्यांनी सांगितलं.  

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : चिंताजनक! जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 22 लाखांवर, तब्बल 154,247 जणांचा मृत्यू

कोरोनाचे रहस्य : ‘तो’ दावा आयसीएमआरने नाकारला

‘कोरोना’ विरोधातील लढ्यासाठी कायदाही सक्षम हवा; विधी तज्ज्ञांचे मत

Web Title: Coronavirus : corona virus will continue to be strong in india till the third week of may vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.