coronavirus: लक्षणे न दिसणाऱ्या रुग्णांसाठीही तितकाच धोकादायक आहे कोरोना? डॉक्टर म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2021 08:07 AM2021-04-07T08:07:19+5:302021-04-07T08:08:34+5:30

coronavirus news : आरोग्य यंत्रणा आणि सरकारसाठी लक्षणे न दिसणारे कोरोनाचे रुग्ण शोधून काढणे ही डोकेदुखी ठरत आहे. कोरोनाच्या लक्षणे न दिसणाऱ्या रुग्णांमध्ये विषाणूचा संसर्ग झालेला असतो. मात्र त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची लक्षणे दिसून येत नाहीत. 

coronavirus: Is coronavirus equally dangerous for asymptomatic patients? The doctor says ... | coronavirus: लक्षणे न दिसणाऱ्या रुग्णांसाठीही तितकाच धोकादायक आहे कोरोना? डॉक्टर म्हणतात...

coronavirus: लक्षणे न दिसणाऱ्या रुग्णांसाठीही तितकाच धोकादायक आहे कोरोना? डॉक्टर म्हणतात...

Next

नवी दिल्ली - गेल्या काही आठवड्यांपासून देशातील कोरोनाच्या (Coronavirus in India) संसर्गाने गंभीर रूप धारण केले आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे सांगण्यात येत असून, महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडत आहेत. या दरम्यान, आरोग्य यंत्रणा आणि सरकारसाठी लक्षणे न दिसणारे कोरोनाचे रुग्ण शोधून काढणे ही डोकेदुखी ठरत आहे. कोरोनाच्या लक्षणे न दिसणाऱ्या रुग्णांमध्ये विषाणूचा संसर्ग झालेला असतो. मात्र त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची लक्षणे दिसून येत नाहीत. ( Is coronavirus equally dangerous for asymptomatic patients? The doctor says ...)

अशा लक्षणे न दिसणाऱ्या रुग्णांना कोरोनाचा कितपत धोका असू शकतो याबाबत अधिक माहिती देणारे वृत्त आज तक ने प्रसारित केले आहे. यासंदर्भात अधिक माहिती देताना हार्ट केअर फाऊंडेशन ऑफ इंडिया आणि कंफडरेशन ऑफ मेडिकल असोसिएशन ऑफ एशियाचे अध्यक्ष डॉ. के. के. अग्रवाल यांनी सांगितले की, जर तुम्हाला कोरोनाची कुठलीही लक्षणे नसतील तर तुम्ही घरच्या घरी उपचार करू शकता. मात्र तीन दिवसांच्या आत तुमची प्रकृती बिघडत असेल तर मात्र तुम्हाला रुग्णालयात दाखल होणे आवश्यक असेल. 

कुठलीही व्यक्ती कोरोनाबाधित आहे मात्र त्याच्यामध्ये कोरोनाबाबत सांगितलेली लक्षणे दिसत नाहीत, हे कसे ओळखावे, असे विचारले असता डॉ. अग्रवाल म्हणाले की, याच्यासाठी एकच पर्याय आहे तो म्हणजे तुम्ही कुठल्याही कोरोनाबाधिताच्या संपर्कात आला असाल तर तुम्ही स्वत:ची चाचणी करून घ्या. अनेकदा असिम्थमॅटिक रुग्णामध्ये त्वरित लक्षणे न दिसता दोन दिवसांनंतर दिसून येतात. अशा परिस्थितीत रुग्णाला १०१ पेक्षा अधिक ताप येत असेल. तुमचा सीआरपी १० पेक्षा अधिक असेल आणि तिसऱ्या दिवशीसुद्धा खोकला येत असेल तर ही तुमच्यासाठी धोक्याची घंटा असेल, तसेच लक्षणे न दिसणाऱ्या रुग्णांमध्ये सीआरपी एक पेक्षा कमी असेल तर त्यांच्यामध्ये प्रकृती बिघडण्याची शक्यता असते. 

डॉ. अग्रवाल यांनी पुढे सांगितले की, सर्वसामान्यपणे लक्षणे न दिसणाऱ्या रुग्णांची प्रकृती गंभीर होत नाही. मात्र जर त्यांची प्रकृती गंभीर होत असेल तर असे लो ग्रेड सिस्टमिक इन्फ्लेमेशन झाले असेल किंवा तुमच्या शरीरातील रक्त आधीपासून जाड असेल तर होऊ शकते. अशा परिस्थितीत सौम्य कोरोनासुद्धा धोकादायक ठरू शकतो. 

केंद्र सरकारचे आरोग्य मंत्रालय, डब्ल्यूएचओ आणि सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (सीडीएस) कडून लक्षणे नसलेले कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणावर असून, त्यांच्या संपर्कात येणाऱ्या निरोगी व्यक्ती किंवा कमी प्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्ती कोरोनाबाधित होत असल्याचे वेळोवेळी सांगण्यात येत आहे. 

Web Title: coronavirus: Is coronavirus equally dangerous for asymptomatic patients? The doctor says ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.