Coronavirus: देशात कोरोनाचा मृत्यूदर केवळ १.५२%; ६४ लाख झाले बरे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2020 07:51 AM2020-10-17T07:51:17+5:302020-10-17T07:51:27+5:30

कोरोना रुग्णांची संख्या ७३ लाख ७० हजारांहून अधिक

Coronavirus: Coronavirus mortality rate in the country is only 1.52%; 64 lakhs | Coronavirus: देशात कोरोनाचा मृत्यूदर केवळ १.५२%; ६४ लाख झाले बरे

Coronavirus: देशात कोरोनाचा मृत्यूदर केवळ १.५२%; ६४ लाख झाले बरे

Next

नवी दिल्ली : देशात शुक्रवारी कोरोनाचे ६३,३७१ नवे रुग्ण आढळून आले असून त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या ७३ लाख ७० हजारांपेक्षा अधिक झाली आहे. आतापर्यंत ६४ लाख जण बरे झाले असून त्यांचे प्रमाण ८७.५६ टक्के आहे.

शुक्रवारी आणखी ८९५ जण मरण पावले. त्यामुळे बळींची एकूण संख्या १,१२,१६१ झाली आहे. सध्या ८,०४,५२८ कोरोनाचे रुग्ण उपचार घेत असून त्यांचे प्रमाण १०.९२ टक्के आहे. कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १.५२ टक्के इतका कमी राखण्यात भारताला यश आले आहे.
कोरोनाचा प्रभावीपणे मुकाबला करण्यासाठी केंद्राने उच्चस्तरीय पथके केरळ, कर्नाटक, राजस्थान, छत्तीसगड या राज्यांमध्ये पाठविली आहेत. या राज्यांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यास त्याचाही अहवाल ही पथके केंद्राला पाठविणार आहेत.

अमेरिकेत ८२ लाख बाधित
अमेरिकेत कोरोनाचे ८२ लाख १७ हजार रुग्ण आहेत. महिनाभरापेक्षाही कमी कालावधीत अमेरिकेमध्ये रुग्णांच्या संख्येत १० लाखांची भर पडली आहे. सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशांत अमेरिका प्रथम, तर भारत दुसऱ्या स्थानी आहे. तिसºया स्थानावर असलेल्या ब्राझीलमध्ये ५१ लाख ७१ हजार रुग्ण आहेत.

Web Title: Coronavirus: Coronavirus mortality rate in the country is only 1.52%; 64 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.