Coronavirus : PM मोदींचा लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय योग्यच; केजरीवालांनी केलं कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 05:18 PM2020-04-11T17:18:24+5:302020-04-11T17:21:24+5:30
पंतप्रधान मोदींनी सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आज संवाद साधला. त्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी एक ट्विट केलं आहे.
नवी दिल्लीः देशात कोरोनाने हाहाकार माजवलेला असून, कोरोनाग्रस्तांची संख्या ही दिवसागणिक वाढतच चालली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. त्याच पार्श्वभूमावर पंतप्रधान मोदींनी सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आज संवाद साधला. त्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी एक ट्विट केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊन वाढवण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे. आज भारताची परिस्थिती इतर विकसित देशांपेक्षा चांगली आहे. कारण आपण आधीच लॉकडाऊन सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. जर लॉकडाऊन आता संपवलं, तर सर्वच प्रयत्नांवर पाणी पडेल. त्यामुळे लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय गरजेचा आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशभरातील लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवलं, जावं असा सल्ला दिला आहे. तसेच केजरीवालांनी काही ठराविक राज्यांमध्ये लॉकडाऊन न वाढवता, संपूर्ण देशभरात लॉकडाऊन वाढवला गेला पाहिजे, असं मत मांडलं आहे. 'लॉकडाऊन संपूर्ण देशात वाढवला पाहिजे. एखाद्या राज्यातून लॉकडाऊन हटवणं आणि एखाद्या राज्यात सुरू ठेवणं योग्य नाही,' असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.PM has taken correct decision to extend lockdown. Today, India’s position is better than many developed countries because we started lockdown early. If it is stopped now, all gains would be lost. To consolidate, it is imp to extend it
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) April 11, 2020
पंतप्रधान मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून राज्यांमधल्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केल्याचं वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीनं दिलं आहे. राज्यातील लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवण्याची तयारी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना सांगितलं. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसोबतच दिल्ली, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनीदेखील लॉकडाऊन वाढवण्याची मागणी पंतप्रधानांकडे केली.Delhi CM Arvind Kejriwal, in the video-conferencing of PM Modi with the Chief Ministers, suggested to PM that the lockdown should be extended till April 30 all over India. #Coronavirus (file pic) pic.twitter.com/cF4hCzhIDV
— ANI (@ANI) April 11, 2020