Coronavirus: ...अन् पंतप्रधान मोदींनी भाजपा खासदारांची घेतली 'शाळा', शिकवला चांगलाच 'धडा'!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 10:12 AM2020-03-18T10:12:54+5:302020-03-18T10:22:42+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संसदेचं कामकाज थांबवण्याची मागणी करणाऱ्या खासदारांना खडे बोल सुनावले आहेत.
नवी दिल्लीः जगभरात कोरोना व्हायरसनं थैमान घातलेलं आहे. अनेक देशांनी कोरोनाला रोखण्यासाठी कसोशीनं प्रयत्न चालवले आहेत. भारतातील रुग्णांची संख्या 140पर्यंत पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत कोरोनानं तीन जणांचा मृत्यू झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर संसदेत खासदारांनी कामकाज स्थगित करण्याची मागणी केली होती, त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी भडकले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संसदेचं कामकाज थांबवण्याची मागणी करणाऱ्या खासदारांना खडे बोल सुनावले आहेत. खासदारांनी आपल्या जबाबदारीतून पळ काढू नये, अनेक जण मोठा धोका असतानाही कर्तव्य बजावत आहेत. मी जे ऐकतो आहे, ते योग्य नाही. खासदारांनी या महारोगराईशी लढण्यासाठी पुढे यायला हवं. भारतीय हवाई दल आणि एअर इंडियाच्या क्रू मेंबर्सचा आपण विचार केला पाहिजे. जे लोक कोरोनाप्रभावित देशांतून भारतीयांना मायदेशात परत आणत आहेत. तसेच कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि नर्सेसचाही विचार करायला हवा. तळागाळातीलही लोकांचाही विचार व्हायला हवा. अशा वेळी जर कामकाज थांबवण्याचा निर्णय घेतल्यास काय होईल?, असा प्रश्नच मोदींनी उपस्थित खासदारांना विचारला आहे.
Coronavirus: एकूण 4 टप्पे! भारतात कोणत्या टप्प्यात आहे 'कोरोना'?, जाणून घ्या https://t.co/ztTqCrZuuv#coronavirusindia#Coronaindia
— Lokmat (@MiLOKMAT) March 18, 2020
संसदेचं अधिवेशन थांबणार नाही- मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाचं सर्वांनीच स्वागत केलं आहे, असंही एका भाजपाच्या खासदारानं सांगितलं. संसदेचं अधिवेशन हे कमी केले जाणार नाही. संसदेचं अधिवेशन हे ठरलेल्या 3 एप्रिलपर्यंत चालणार आहे. पंतप्रधानांनी या बैठकीत मीडियाचीही भूमिकाही स्पष्ट केली आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मीडियाचं कौतुक केलं आहे. प्रसारमाध्यमांमधून कोविड-19च्या संबंधी लोकांना योग्यपद्धतीनं जागरूक करण्यात येत आहे. मोदींनी खासदारांना हात जोडून नमस्कारही केला आहे. तसेच प्रत्येक खासदारांना आपल्या मतदारसंघात जाऊन लोकांमध्ये जनजागृती करण्याचं अपील केलं आहे.
Coronavirus: एकूण 4 टप्पे! भारतात कोणत्या टप्प्यात आहे 'कोरोना'?, जाणून घ्या
Coronavirus: राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 42वर, पुण्यात आढळला आणखी एक रुग्ण
Coronavirus : कोरोनानं लष्करातील जवानही संक्रमित; देशातील रुग्णांची संख्या 140वर