coronavirus: अशा ठिकाणी अधिक वेगाने पसरतो कोरोना विषाणू, संशोधनातून समोर आली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 06:32 AM2020-09-03T06:32:56+5:302020-09-03T06:34:18+5:30

जेव्हापासून कोरोना विषाणूच्या फैलावास सुरुवात झाली आहे. तेव्हापासून शास्त्रज्ञ या आजाराबाबत सातत्याने संशोधन करत आहेत. तसेच या संशोधनामधून आता एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे.

Coronavirus: Coronavirus spreads faster in such places, research reveals | coronavirus: अशा ठिकाणी अधिक वेगाने पसरतो कोरोना विषाणू, संशोधनातून समोर आली माहिती

coronavirus: अशा ठिकाणी अधिक वेगाने पसरतो कोरोना विषाणू, संशोधनातून समोर आली माहिती

Next
ठळक मुद्देकोरोना विषाणूबाबत शास्त्रज्ञांनी पुन्हा एकदा दिला इशारा बसमधून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीच्या माध्यमातून सुमारे दोन डझन लोक कोरोनाबाधित झाल्याचे समोर या संसर्गाचे कारण बसमध्ये असलेला एसी असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे

नवी दिल्ली - एकीकडे अनलॉक-४ चा टप्पा सुरू झाला आहे. मात्र देशातील कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या महिन्यापासून देशात सातत्याने ५० हजारांहून अधिक रुग्ण सापडत आहेत. मात्र सरकारी पातळीवर कोरोना चाचण्यांची मोठ्या प्रमाणात वाढवलेली संख्या ही त्यामागील कारण असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, जेव्हापासून कोरोना विषाणूच्या फैलावास सुरुवात झाली आहे. तेव्हापासून शास्त्रज्ञ या आजाराबाबत सातत्याने संशोधन करत आहेत. तसेच या संशोधनामधून आता एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे.

कोरोना विषाणूबाबत शास्त्रज्ञांनी पुन्हा एकदा इशारा दिला आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार बसमधील एअर कंडिशनिंग व्यवस्थेमुळे कोरोना विषाणूचा फैलाव वेगाने होऊ शकतो. शास्त्रज्ञांनी एका संशोधनानंतर ही माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शास्त्रज्ञांनी चीनमधील एका घटनेचा अभ्यास केला. त्यामध्ये बसमधून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीच्या माध्यमातून सुमारे दोन डझन लोक कोरोनाबाधित झाल्याचे समोर आले आहे.

चीनमधील शिनजियांग प्रांतामध्ये एका बसमधून प्रवास करणाऱ्या २४ प्रवाशांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या सर्व लोकांना बसमधून केवळ दीड तास प्रवास केला होता. आता या संसर्गाचे कारण बसमध्ये असलेला एसी असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.

बसमध्ये असलेल्या एसीमुळे कोरोनाचा विषाणू वेगाने पसरतो असा दावा संशोधकांनी केला आहे. एसी बंद जागेमध्ये कोरोनाच्या संसर्गाला वेगाने पसवरू शकतो, डोम एअर कंडिशन बाहेरून हवा खेचतात. मात्र बहुतांश एअर कंडिशनर हे आतल्या आत हवेला रिसायकल करतात, असा दावा संशोधकांनी केला आहे.

संबंधित बसमध्ये एसी असल्याने आतल्या हवेला रिसायकल केले जात होते. त्यामुळे हा प्रकार घडला. त्यामुळे बसमध्ये हवेचे थेंब पसरले गेले, असे संशोधकांचे मत आहे.

जेएएमए इंटरनॅशनल मेडिसिनमध्ये प्रकाशित अभ्यासानुसार चीनच्या झिजियांग प्रांतामधील सेंटर फॉर डिजीज कंट्रो अँड प्रिवव्हेंशनमधील शास्त्रज्ञांना संशोधनादरम्यान दिसून आले की, बसमधून संसर्ग झालेल्या २४ पैकी १८ प्रवासी हे आजारी पडले, तर ६ जण बरे झाले. या प्रवाशांमध्ये कुठलीही लक्षणे नव्हती. दुसरीकडे जर आपण अन्य कुठल्याही संकेतस्थळाचा विचार केल्यास हा अभ्यास जानेवारीमध्ये घडलेल्या घटनेसंदर्भातील आहे. या बसमध्ये लोक सोशल डिस्टंसिंगचं पालन करत नव्हते. मात्र या सर्वांनी मास्क परिधान केलेला होता.

Web Title: Coronavirus: Coronavirus spreads faster in such places, research reveals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.