Coronavirus : चीननं आता भारताला फसवलं?; सुरक्षा चाचणीत 50,000 PPE किट्स फेल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 12:01 PM2020-04-16T12:01:04+5:302020-04-16T12:12:36+5:30
30,000 और 10,000 किट्सच्या दोन लहान खेप देखील आल्या, ज्या चाचणीत अयशस्वी ठरल्या आहेत. ग्वाल्हेरच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या प्रयोगशाळेत या किट्सची चाचणी घेण्यात आली.
नवी दिल्ली: कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत असून, रुग्णसंख्येतही भर पडत आहे. गुरुवारपर्यंत देशात एकूण 12,000 रुग्णांची नोंद झाली आहेत. त्याच पार्श्वभूमीवर भारताने चीनकडून 15 दशलक्ष पीपीई किट्स मागवल्या आहेत. दरम्यान, चीनच्या मोठ्या खासगी कंपन्यांकडून मिळालेल्या बर्याच किट्स सुरक्षा चाचणीत अपयशी ठरल्या आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, चीनकडून 1,70,000 पीपीई किट्स आल्या आहेत, ज्यामध्ये गुणवत्ता चाचणीत 50,000 किट्स अपयशी ठरल्या आहेत. 30,000 और 10,000 किट्सच्या दोन लहान खेप देखील आल्या, ज्या चाचणीत अयशस्वी ठरल्या आहेत. ग्वाल्हेरच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या प्रयोगशाळेत या किट्सची चाचणी घेण्यात आली.
चीनकडूनच घेतले सर्व सूट
रिपोर्टनुसार, एका सरकारी अधिकाऱ्यानं सांगितलं की, आपण फक्त CE/FDAcertified पीपीई किट्स खरेदी करीत आहोत. दानाच्या स्वरूपात प्राप्त झालेल्या काही किट्स गुणवत्ता चाचणी अयशस्वी ठरल्या आहेत. त्याचा वापर केला जाऊ शकत नाही. त्याच वेळी, या प्रकरणात एका अधिकाऱ्यानं म्हटले आहे की, एफडीए / सीई-मान्यताप्राप्त किट्सना भारताची गुणवत्ता चाचणी उत्तीर्ण करावी लागेल. गुणवत्ता चाचणीत अपयशी ठरलेल्या किट्स भारताला एका मोठ्या खासगी कंपन्यांकडून दान स्वरूपात मिळाल्या होत्या.
पीपीई किट्सच्या घरगुती उत्पादनात तेजी
रिपोर्टनुसार, मेच्या पहिल्या आठवड्यात आपल्याकडे सूट यायला हवेत, असंसुद्धा एका अधिकाऱ्याचं म्हणणं आहे. सूटच्या आणखी ऑर्डर देण्यात येत आहेत. जर भारताकडे 2 दशलक्ष पीपीई असते, तर भारत चांगल्या स्थितीत असता. घाबरून जाण्याची गरज नसल्याचंही या सरकारी अधिकाऱ्यानं सांगितलं आहे. पीपीई किट्सच्या ऑर्डर्सची संख्या वाढत आहे. चीन हा प्रमुख पुरवठा करणारा देश आहे. आम्ही पूर्वी आयातीवर पूर्णपणे अवलंबून होतो आणि मागणी वाढेल, अशी कधीच अपेक्षा केली नव्हती. त्यामुळे पीपीई किट्सचे घरगुती उत्पादन जोरात सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.