CoronaVirus : चिंता वाढली! गेल्या 24 तासांत 1553 कोरोनाचे नवे रुग्ण, 36 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 05:32 PM2020-04-20T17:32:19+5:302020-04-20T17:33:38+5:30
CoronaVirus: आतापर्यंत देशात 17265 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे
नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार माजला आहे. देशातही वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनाने थैमान घातले आहे. गेल्या 24 तासांत 1553 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत, तर 36 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात 17265 लोकांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आहे.
देशातील 23 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 59 जिल्हे कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 28 दिवसांत पुदुचेरीमधील माहे आणि कर्नाटकातील कोडागु आणि उत्तराखंडमधील पौडी गढवाल जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण आढळला नाही. गोवा राज्य पूर्णपणे कोरोना मुक्त झाले आहे, असे आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले.
Since yesterday there have been 1553 additional confirmed #COVID19 cases, taking the total number of confirmed cases in the country to 17265. 36 more deaths also reported in the last 24 hours: Lav Agarwal, Joint Secretary, Health Ministry pic.twitter.com/6EKGeIOWOe
— ANI (@ANI) April 20, 2020
याचबरोबर, देशात गेल्या 24 तासांत 1553 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत, तर 36 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात 17265 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे, असे लव अग्रवाल यांनी सांगितले.
Mahe in Puducherry, Kodagu in Karnataka & Pauri Garhwal in Uttarakhand have not reported any #COVID19 case in last 28 days. The number of districts where no case has been reported in last 14 days has increased to 59. Goa is now COVID-19 free: Lav Agarwal, Union Health Ministry pic.twitter.com/XqTrIZ0Vkx
— ANI (@ANI) April 20, 2020
गृह मंत्रालयाचे लॉकडाऊनवर लक्ष
केंद्रीय गृह मंत्रालय देशभरातील लॉकडाऊन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. लॉकडाऊनचे उल्लंघन झाल्यानंतर संबंधित राज्यांना त्यासंबंधी नियमांच्या सूचना मंत्रालयातील नियंत्रण कक्षातून देण्यात येत आहेत. आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या नियमांचे पालन करण्याचे राज्यांना आवाहन केले जात आहे, असे गृह मंत्रालयाच्या सह सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी सांगितले.