CoronaVirus : तेव्हा 9 गोळ्या, आता 9 दिवस...; पुन्हा एकदा मृत्यूचा सामना करत व्हेंटिलेटरवरून बाहेर आले चीता

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 09:27 AM2021-06-10T09:27:04+5:302021-06-10T09:32:33+5:30

कोरोना संक्रमित झाल्यानंतर कमांडंट चीता यांना 9 मेरोजी एम्स झज्जर येथे दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृती अधिक खालावल्यानंतर त्यांना 30 मेरोजी व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते. (Crpf commandant chetan kumar cheetah)

CoronaVirus Crpf commandant chetan kumar cheetah fights back again taken off ventilator after nine days | CoronaVirus : तेव्हा 9 गोळ्या, आता 9 दिवस...; पुन्हा एकदा मृत्यूचा सामना करत व्हेंटिलेटरवरून बाहेर आले चीता

CoronaVirus : तेव्हा 9 गोळ्या, आता 9 दिवस...; पुन्हा एकदा मृत्यूचा सामना करत व्हेंटिलेटरवरून बाहेर आले चीता

Next

नवी दिल्ली - सीआरपीएफ (CRPF) कमांडंट चेतन कुमार चीता (chetan kumar cheetah) हे पुन्हा एकदा अपल्या स्पिरिटमुळे चर्चेत आहेत. सीआरपीएफच्या या धाडसी जवानाने यावेळी कोरोना संक्रमणाविरोधात आपले स्पिरिट दाखवले आहे. कोरोना संक्रमित झाल्यानंतर कमांडंट चीता यांना 9 मेरोजी एम्स झज्जर येथे दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृती अधिक खालावल्यानंतर त्यांना 30 मेरोजी व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते. खरे तर डॉक्टरांनाही त्याच्या स्थितीबद्दल फारशी खात्री नव्हती. पण असे असतानाही कमांडंट चीता यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आणि 9 दिवसांनंतर त्यांचे व्हेंटिलेटर काढण्यात आले. आता त्यांना हाय ऑक्सिजन फ्लोवर ठेवण्यात आले आहे. (CoronaVirus Crpf commandant chetan kumar cheetah fights back again taken off ventilator after nine days)

उत्तम नर्सिंग असेल आवश्यक -
हरियाणातील झज्जर येथे राष्ट्रीय कर्करोग संस्थेतील (NCI) कोविड सर्विसेसच्या चेअरपर्सन डॉ. सुषमा भटनाग यांनी टीओआयसोबत बोलताना सांगितले, की कीर्ति चक्र पुरस्कार विजेते अधिकारी शुद्धीवर आहेत. ते बोलण्याशिवाय, हलके जेवणही घेण्याच्या स्थितीत होते. त्यांची प्रकृती स्थिर राहिली तर, त्यांची काउंसिलिंग करणे, हे आमचे पुढचे पाऊल असेल. तसेच, डॉक्टरांचे म्हणने आहे, की ते पूर्णपणे बरे व्हावेत यासाठी त्यांच्या नर्सिंग देखभालीवर लक्ष ठेवावे लागेल."

दहशतवादी हल्ल्यात लागल्या होत्या 9 गोळ्या -
यापूर्वी, चेतन कुमार चीता हे काश्मीर खोऱ्यात सीआरपीएफच्या 45व्या बटालियनचे कमांडिंग ऑफिसर होते. 2017 मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत एका चकमकीत ते गंभीर जखमी झाले होते. त्यावेळी त्यांना 9 गोळ्या लागल्या होत्या. या गोळ्या ब्रेन, उजवा डोळा, पोट, दोन्ही हात आणि मागे कमरेच्या खाली लागल्या होत्या. मात्र या कठीण स्थितीतही त्यांनी आपल्या पोलादी इच्छा शक्तीच्या बळावर  मृत्यूवर विजय मिळवला.

एम्सच्या डॉक्टरांनी केले होते अनेक ऑपरेशन -
तेव्हा एम्स ट्रॉमा सेंटरच्या डॉक्टरांनी त्यांना वाचविण्यासाठी अनेक प्रकारचे ऑपरेशन केले होते. त्यांनी सर्वप्रथम चीता यांना स्टेबल केले होते. यानंतर डॉक्टरांच्या वेगवेगळ्या टीमने वेगवेगळे ऑपरेशन्स केले. डोळ्यांच्या आजारांशी संबंधित तज्ज्ञांनी उजव्या डोळ्यावर उपचार केले. मात्र, उजव्या डोळ्यावरील उपचारांना यश आले नाही . आर्थोपेडिक्सने शरीरातील फ्रॅक्चर्सवर काम केले. तर क्रिटिकल केअर एक्सपर्ट्सनी इन्फेक्शन रोखण्यासाठी अँटीबायोटिक ट्रिटमेंटची प्लॅनिंग केली होती. त्यांना एप्रिल 2017 मध्ये रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 2018 मध्ये ते परत ड्यूटीवर जॉइन झाले.

Web Title: CoronaVirus Crpf commandant chetan kumar cheetah fights back again taken off ventilator after nine days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.