कोरोनाने वाढवली चिंता! गेल्या 7 दिवसांत 78 टक्के प्रकरणे वाढली, मृत्यूची संख्याही वाढतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2023 07:48 AM2023-03-27T07:48:19+5:302023-03-27T07:48:50+5:30

coronavirus daily case : गेल्या सात दिवसांतील प्रकरणांची गेल्या सात दिवसांशी तुलना केल्यास, कोरोना विषाणूच्या प्रकरणांमध्ये 78 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर या कालावधीत 19 वरून 29 मृत्यूची नोंद झाली आहे.

coronavirus daily case high after 210 days covid-19 death increase | कोरोनाने वाढवली चिंता! गेल्या 7 दिवसांत 78 टक्के प्रकरणे वाढली, मृत्यूची संख्याही वाढतेय

कोरोनाने वाढवली चिंता! गेल्या 7 दिवसांत 78 टक्के प्रकरणे वाढली, मृत्यूची संख्याही वाढतेय

googlenewsNext

नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आणि मृत्यूची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या शनिवारी कोरोना विषाणूची 1890 नवीन प्रकरणे नोंदवली गेली, जी गेल्या 210 दिवसांतील सर्वाधिक आहे. गेल्या सात दिवसांतील प्रकरणांची गेल्या सात दिवसांशी तुलना केल्यास, कोरोना विषाणूच्या प्रकरणांमध्ये 78 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर या कालावधीत 19 वरून 29 मृत्यूची नोंद झाली आहे. शनिवारी समोर आलेल्या कोरोना विषाणूची प्रकरणे गेल्या वर्षी 22 ऑक्टोबरनंतर देशात सर्वाधिक होती, तेव्हा 1,988 नवीन प्रकरणे नोंदवली गेली.

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, गेल्या सात दिवसांत (19-25 मार्च) भारतात कोरोना विषाणूची 8,781 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत, जी मागील सात दिवसांतील 4,929 पेक्षा 78 टक्के जास्त आहे. हे मागील आठवड्यात दिसलेल्या 85 टक्के वाढीइतके आहे. गेल्या सहा आठवड्यांपासून देशात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. देशातील दैनंदिन प्रकरणे आठ दिवसांत दुप्पट होत आहेत. रोजच्या प्रकरणांची सात दिवसांची सरासरी शनिवारपर्यंत 1,254 वर पोहोचली होती, जी आठ दिवस आधी (17 मार्च) 626 होती.

महाराष्ट्रात वाढली रुग्णांची संख्या
याचबरोबर, सलग दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रात गेल्या सात दिवसांत देशात सर्वाधिक नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. 19 ते 25 मार्च दरम्यान महाराष्ट्रात कोरोनाची 1,956 प्रकरणे नोंद झाली आहेत. 12 मार्च ते 19 मार्च या कालावधीत 1,165 प्रकरणे समोर आली आहेत. जी आता 68 टक्के अधिक आहे. बहुतेक राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. यामध्ये हरयाणा, दिल्ली, यूपी, गुजरात, हिमाचल आणि गोवा यांचा समावेश आहे.

दिल्लीत कोरोनाची 153 नवीन प्रकरणे
रविवारी दिल्लीत कोरोनाची 153 नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली. यादरम्यान कोरोनाचा संसर्ग दर 9.13 टक्क्यांवर पोहोचला आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून ही माहिती मिळाली आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, शनिवारी दिल्लीत 4.98 टक्के कोरोना संसर्ग दरासह 139 प्रकरणे नोंदवली गेली. शुक्रवारी 6.66 टक्के संसर्ग दरासह 152 प्रकरणे नोंदवली गेली, तर गुरुवारी 4.95 टक्के संसर्ग दरासह 117 प्रकरणे नोंदवली गेली. तसेच, राष्ट्रीय राजधानीत गेल्या ऑक्टोबरमध्ये तीन अंकी प्रकरणांची नोंद झाली.

Web Title: coronavirus daily case high after 210 days covid-19 death increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.