Coronavirus : 'माझ्या वडिलांना वाचवा'... लेकीची पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना विनवणी; Video पाहून व्हाल भावूक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 09:32 AM2020-04-21T09:32:23+5:302020-04-21T09:40:56+5:30
Coronavirus : वडिलांना वाचवा असं म्हणत सरकारी रुग्णालयांमधील भीषण वास्तव सांगणारा मुलीचा एक व्हिडीओ आहे.
नवी दिल्ली - वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसच्या जगव्यापी साथीने प्रगत देशांना हतबल केले आहे. सर्वतोपरी प्रयत्न करूनही आव्हाने वाढत आहेत. एक-दुसऱ्यापासून दूर राहणे, घराबाहेर न पडणे, घरातच राहणे, हा एकमेव मार्ग आहे. यात जराही निष्काळजीपणा केल्यास भारताला जबर किंमत मोजावी लागेल. त्याचा अंदाज बांधणेही कठीण आहे, असं कळकळीने सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. मोदींनी लोकांना जेथे आहात तेथेच राहण्याचे आवाहन केले आहे. मात्र याच दरम्यान अनेक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अशीच एक घटना दिल्लीमध्ये घडली आहे.
दिल्लीतील एका मुलीच्या वडिलांना कोरोनाची लागण झाली आहे. मुलीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे वडिलांना वाचवा असं सांगत मदत मागितली आहे. वडिलांना वाचवा असं म्हणत सरकारी रुग्णालयांमधील भीषण वास्तव सांगणारा मुलीचा एक व्हिडीओ आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना या व्हिडीओतून मुलीने आणि तिच्या आईने विनवणी केल्याचं दिसत आहे. मिळलेल्या माहितीनुसार, प्रतिभा गुप्ता असं या मुलीचं नाव असून ती दिल्लीच्या जहांगीरपुरा येथील सेक्टर ‘जी’ मध्ये राहते.
He called yesterday, told us that he was being taken to quarantine facility and was kept in a room for 9 hrs and again shifted to the hospital ward stating that it was too late. Today at 5 am, His fever is 102C and yet no doctors. Please help pic.twitter.com/3WcQrTpea7
— Shweta Gupta (@ShwetaG18133958) April 20, 2020
'माझ्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली. उपचारासाठी त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांना शंका आल्याने त्यांनी त्यांची कोरोना चाचणी केली. त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली. यानंतर रुग्णालयाने कोणतीही कल्पना न देता वडिलांना सरकारी रुग्णालयामध्ये हलवलं. 18 तारखेला किमान दोन-तीन तासांच्या प्रतीक्षेनंतर त्यांना रात्री 8 वाजता दाखल केलं गेलं. दाखल केल्यानंतर दुसरा दिवशी दुपारी 12 वाजेपर्यंत त्यांना नाश्ता, जेवण काहीही दिलं गेलं नाही. त्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा आजार आहे. त्यांना वेळेवर अन्न-पाणी दिलं नाही तर त्यांना अधिक धोका निर्माण होऊ शकतो. त्यांना 102 ताप आहे. मात्र स्टाफ, नर्सकडे त्यांनी मदत मागितली. पण कोणीच मदत करत नाही' असं मुलीने व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.
Coronavirus : ...अन् रुग्णाची प्रकृती सुधारली, कोरोनाच्या उपचारात 'ही' थेरपी आशेचा किरण ठरलीhttps://t.co/y315r66fu5#coronavirusinindia#CoronaUpdatesInIndia
— Lokmat (@MiLOKMAT) April 21, 2020
'पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना हात जोडून आम्ही विनंती करत आहोत, कृपया आम्हाला मदत करा. जे बातम्यांमध्ये दाखवलं जातं आहे आणि वास्तवात घडत आहे यात प्रचंड तफावत आहे. आम्ही त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करू शकतो. पण सरकारच्या आदेशानुसार आम्हाला तेही करू दिले जात नाही. आम्ही घरात बसून आहोत. चिंता आणि काळजी करण्याशिवाय काहीच करू शकत नाही. मोदीजी, केजरीवालजी आम्ही हात जोडतो, माझ्या वडिलांचे प्राण वाचवा' अशी विनवणी मुलीने केली आहे. यासोबतच व्हिडीओमध्ये तिच्या आईनेही आपल्या पतीला वाचवण्याची विनंती केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : ...अन् रुग्णाची प्रकृती सुधारली, कोरोनाच्या उपचारात 'ही' थेरपी आशेचा किरण ठरली
CoronaVirus: दिलासादायक; कोरोना संसर्गाचा वेग मंदावला; रुग्ण दुपटीचा कालावधी ७ दिवसांवर
CoronaVirus: राज्यात कोरोनाचा वाढला प्रकोप; एकट्या मुंबईत तीन हजारहून अधिक रुग्ण