Coronavirus: ऑक्टोबरमध्ये घटतेय संख्या; ५६ दिवसांनी नव्या रुग्णांची संख्या आली ५५ हजारांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2020 02:26 AM2020-10-14T02:26:25+5:302020-10-14T06:53:54+5:30
१८ ऑगस्ट रोजी ५५ हजार ७९ एवढे नवे रुग्ण वाढले होते. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात २४ तासांत नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण ९० हजारांच्याही पुढे गेले होते.
नवी दिल्ली : कोरोनातून मुक्तीच्या दिशेने जाण्यासाठी ऑक्टोबरमध्ये दिलासादायक आकडेवारी समोर येत आहे. २४ तासांतील नवीन रुग्ण वाढण्याचा वेग मंदावला आहे. तब्बल ५६ दिवसांनी नव्या रुग्णांची संख्या पुन्हा ५५ हजार एवढी खाली आली आहे.
१८ ऑगस्ट रोजी ५५ हजार ७९ एवढे नवे रुग्ण वाढले होते. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात २४ तासांत नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण ९० हजारांच्याही पुढे गेले होते. आता हे प्रमाण ५५,३४२ वर आले आहे. प्रतिदिन आढळणाऱ्या कोरोना रुग्णांचे प्रमाण ९ ते १५ सप्टेंबर या काळात ८.५० टक्के होते. ते ७ ते १३ ऑक्टोबरमध्ये ६.२४ टक्क्यांवर आले. सध्या ८,३८,७२९ रुग्ण उपचार घेत आहेत. गेल्या पाच आठवड्यांपासून भारतात दररोज आढळणाºया कोरोनाबाधित नवीन रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. सप्टेंबरच्या मध्यानंतर वाढलेली रुग्णसंख्या ९० हजारांवर गेली होती. या १५ ते २० दिवसांच्या काळात दररोज आढळणाºया रुग्णांची संख्या जवळपास अर्ध्यावर आली आहे.
१.५ रुग्णांना कोणताही आजार नव्हता
एकूण ७० टक्के पुरुष आणि ३० टक्के महिलांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. मृत पावलेल्या ४५ ते ६० वर्षे वयोगटातील १३.९ टक्के रुग्णांना अन्य आजार होते, तर १.५ रुग्णांना कोणताही आजार नव्हता.