Coronavirus: अवैधरित्या चीनला ५ लाख मास्क अन् ५७ लीटर सॅनिटायझर पाठवण्याचा डाव हाणून पाडला!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 12:46 PM2020-05-14T12:46:00+5:302020-05-14T12:49:55+5:30
दिल्ली आयजीआय एअरपोर्टवर मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून हे समोर आणलं.
नवी दिल्ली – कोरोना व्हायरसचं संक्रमण देशभरात वाढत असताना ७८ हजारांहून जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर अडीच हजारांहून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या संकटकाळात देशात मास्क, सॅनिटायझर आणि पीपीई किट्स या सुरक्षा उपकरणांची मागणी वाढत आहे. अशातच अवैधरित्या या वस्तू चीन आणि अन्य देशांमध्ये निर्यात करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
दिल्ली आयजीआय एअरपोर्टवर मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून हे समोर आणलं. विभागाने ५ लाख ८० हजार मास्क, ९५० बॉट्ल्समध्ये ५७ लीटर सॅनिटायझर आणि नवी दिल्लीयेथील कूरिअर टर्मिनलवर ९५२ पीपीई किट्ससह अन्य शिपमेंट थांबवण्यात आलं. या सर्व वस्तू देशाबाहेर निर्यात करण्याचा प्रयत्न केला जात होता. यासोबतच कस्टम विभागाने २ हजार ४८० किलो रॉ मटेरियलदेखील जप्त केले. जे चीनला पाठवण्यात येत होते.
आता या प्रकरणाचा तपास केला जात असून हा माल परदेशात कोण पाठवत होता याचा शोध घेतला जात आहे. डीजीएफटीच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार हे सामान निर्यात केलं जाऊ शकत नाहीत. सध्या देशात कोरोना विषाणूच्या साथीचे संकट आहे अशा परिस्थितीत भारत सरकारने बर्याच वैद्यकीय वस्तूंच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. १९ मार्च रोजी सरकारने या वस्तूंची निर्यात थांबविली होती. त्यामध्ये सॅनिटायझर्स, मास्क देखील आहेत. त्याचवेळी या संकटात भारतात एन-९५ मास्क आणि पीपीई किट बनवण्याचे काम सुरू आहे.
कोरोना व्हायरसच्या या लढाईत या वैद्यकीय वस्तू महत्वाची भूमिका बजावतात. कोरोना विषाणूच्या वाढत्या रुग्णसंख्येसोबतच या वैद्यकीय उपकरणांची मागणीही सतत वाढत आहे. अशा परिस्थितीत हा माल गुप्तपणे परदेशात पाठविणे गुन्हा मानला जातो.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
...तर येत्या ६ महिन्यात ५ लाखांहून जास्त एड्स रुग्णांचा मृत्यू; WHO चा धक्कादायक रिपोर्ट
आयुष्यात ‘ती’ गोष्ट जिव्हारी लागली; एमबीबीएस डॉक्टर थेट IAS अधिकारी बनली!
विधान परिषद उमेदवारीवरुन भाजपात नाराजी वाढली; खडसेंपाठोपाठ ‘या’ नेत्याचा पक्षाला घरचा आहेर
अर्थमंत्र्यांची घोषणा ५.९४ लाख कोटींची पण सरकारी खिशातून आता फक्त ५६,५०० कोटी जाणार!
...म्हणून ईडी, सीबीआयसारख्या राजकीय संस्थांचे लॉकडाऊन करा; शिवसेनेची मोठी मागणी