coronavirus: दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली कोरोनाला मात, आज रुग्णालयातून मिळणार डिस्चार्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 05:42 PM2020-06-26T17:42:54+5:302020-06-26T17:43:04+5:30
सत्येंद्र जैन यांची आज केलेली कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे आज त्यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली - गेल्या आठवडाभरापासून कोरोनाशी झुंजत असलेले दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी कोरोनाला यशस्वीपणे मात दिली आहे. सत्येंद्र जैन यांची आज केलेली कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे आज त्यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.
दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे गेल्या आठवड्यात निष्पन्न झाले होते. सत्येंद्र जैन यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्यांची पहिली कोविड चाचणी निगेटिव्ह आली होती. मात्र दुसऱ्या चाचणीत ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते.
Delhi Minister Satyendar Jain tests negative for #COVID19, to be discharged from hospital today. (file pic) pic.twitter.com/TekQZj1gW0
— ANI (@ANI) June 26, 2020
तेव्हापासून त्यांच्यावर दिल्लीतील साकेत परिसरातील मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू होते. ५५ वर्षीय जैन यांन प्लाझ्मा थेरेपीही देण्यात आली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती सुधारली होती. अखेर आज त्यांची कोविड टेस्ट निगेटिव्ह आली आहे. आता त्यांना आजच रुग्णालयातून सुट्टी मिळण्याची शक्यता आहे.