CoronaVirus : चिंताजनक! डेल्टा प्लसची प्रकरणे 15 दिवसांत सहा पट वाढली, आतापर्यंत 13 म्यूटेशन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2021 11:42 AM2021-09-04T11:42:35+5:302021-09-04T11:42:59+5:30
CoronaVirus : रिपोर्टनुसार, ९ ते ३१ ऑगस्ट दरम्यान १० हजारहून अधिक नमुन्यांचे जीनोम सिक्वेंसिंग करण्यात आले होते, ज्यामध्ये एकमेव डेल्टा प्लस व्हेरिएंटमध्ये ६.४४ पट वाढ नोंदविली गेली.
नवी दिल्ली : केरळसह देशातील काही राज्यांमध्ये परिस्थिती गंभीर असल्याने दुसरी लाट अजूनही कायम आहे. यातच इन्साकॉगने गेल्या तीन आठवड्यांतील परिस्थितीवर धक्कादायक अहवाल जाहीर केला आहे. त्यानुसार कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या प्रकरणांमध्ये गेल्या १५ दिवसांत केवळ सहापट वाढ झाली आहे. तसेच, डेल्टा व्हेरिएंटपासून आतापर्यंत १३ म्यूटेशन आढळले आहेत आणि भारतात प्रत्येकाची पुष्टी झाली आहे. अशा ८५६ नमुन्यांची ओळख पटविण्यातही शास्त्रज्ञांना यश आले आहे.
रिपोर्टनुसार, ९ ते ३१ ऑगस्ट दरम्यान १० हजारहून अधिक नमुन्यांचे जीनोम सिक्वेंसिंग करण्यात आले होते, ज्यामध्ये एकमेव डेल्टा प्लस व्हेरिएंटमध्ये ६.४४ पट वाढ नोंदविली गेली. याबाबत इन्साकॉगनेही चिंता व्यक्त केली आहे आणि लोकांना कोरोनापासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. बऱ्याच लोकांना असे वाटते की, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आता कमी झाला आहे. मात्र, वैज्ञानिकदृष्ट्या असे पुरावे उपलब्ध नाहीत. कोरोना व्हायरस सतत आपले रुप बदलत आहे आणि यापैकी कोणता म्यूटेशन येत्या काही दिवसांत काय परिणाम करले? त्याबद्दल कोणालाही माहिती नाही.
६८% नमुम्यांमध्ये धोकादायक व्हेरिएंट
शास्त्रज्ञांनी सांगितले की, ६८% जीनोम सिक्वेंसिंगमध्ये केवळ डेल्टा व्हेरिएंट आढळला आहेत. हा लसीकरणानंतरही लोकांना संक्रमित करू शकतो. दुसरीकडे, सहा महिन्यांपूर्वी संसर्ग झालेल्या व्यक्तीला पुन्हा कोरोनाचा सामना करावा लागू शकतो. इन्साकॉगने सांगितले की, आतापर्यंत डेल्टा व्हेरिएंटमध्ये एवाय-१ ते एवाय-१२ पर्यंत १३ म्यूटेशन आढळले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, हे सर्व म्यूटेशन भारतात आढळले आहेत. या सर्व म्यूटेशनची पुष्टी ८५६ नमुन्यांमध्ये झाली आहे. रिपोर्ट म्हटले आहे की, पुनर्वर्गीकरणानंतरही डेल्टा भारतातील कोरोना व्हायरसचा एक प्रमुख वंश बनला आहे.