Coronavirus :"कोरोना वाईट, खूप वाईट, प्लिज दुर्लक्ष करू नका…,’’ अखेरच्या व्हिडीओमधून गर्भवतीचे भावूक आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 10:16 PM2021-05-11T22:16:04+5:302021-05-11T22:30:08+5:30
Coronavirus in India: या महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या पतीने डोळ्यांत पाणी आणणार हा भावूक व्हिडीओ शेअर केला आहे.
नवी दिल्ली - हॅलो एव्हरीवन, हा व्हिडीओ तयार करताना मला खूप त्रास होत आहे. मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितेय की, कोरोनाकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. त्याची लक्षणे वाईट आहेत. खूप वाईट आहेत. मला नीट बोलणेही शक्य होत नाही आहे. पण मला माझे आवाहन तुमच्यापर्यंत पोहोचवायचे आहे. जेव्हा घराबाहेर पडाल, कुणाशी बोलत असाल, तेव्हा प्लिज मास्क वापरा, हे भावूक शब्द आहेत एका गर्भवतीचे. जिचा काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाविरोधातील लढाई ती हरली. मात्र अखेरच्या व्हिडीओमधून तिने लोकांना कोरोनापासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. ("Do not take the corona lightly ...", emotional appeal from pregnant woman from the last video)
या महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या पतीने डोळ्यांत पाणी आणणार हा भावूक व्हिडीओ शेअर केला आहे. या महिलेचे नाव दीपिका होते. ११ एप्रिल रोजी तिचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर कोरोनाशी झुंजत असताना तिने १७ एप्रिल रोजी हा व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. मात्र नंतर तिची प्रकृती बिघडत गेली आणि २६ एप्रिल रोजी ती कोरोनाविरोधातील लढाई हरली. पती आणि अवघ्या साडेतीन वर्षांच्या मुलाला मागे सोडून तिने जगाचा निरोप घेतला.
तिच्या मृत्युनंतर तिच्या पतीने हा व्हिडीओ शेअर करून आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली आहे. या व्हिडीओत ती पुढे म्हणते की, तुम्ही मास्क अवश्य वापरा. मग तुम्ही घरात असा वा घराबाहेर मास्क जरूर वापरा. तुमच्या निकटवर्तीयांना सुरक्षित ठेवण्यासाठी मास्क वापरा. मी अपेक्षा करते की, अशी वेळ कुणावरही येऊ नये. विशेष करून गर्भावस्थेमध्ये. कृपया आपल्या कुटुंबीयांना सांगा की, कोरोनाकडे दुर्लक्ष करू नका. त्याला अजिबात हलक्यात घेऊ नका. प्लिज, बेजबाबदार बनू नका.
I lost my pregnant wife and our unborn child to covid
— Ravish Chawla (@ravish_chawla) May 9, 2021
She breathed her last on 26/4/21 and our unborn child a day earlier. She got covid positive on 11/4 and even during her suffering she had made the above video on 17/4 warning others not to take this covid lightly. #CovidIndiapic.twitter.com/Syg6yddMTD
दीपिकाचे पती रवीश चावला यांनी हा व्हिडीओ ९ मे रोजी ट्विटरवर शेअर केला होता. रवीश यांनी व्हिडीओ शेअर करताना लिहिले की, ती पूर्णपणे मातृत्वासाठी समर्पित होती. ती तिच्या जन्म न झालेल्या बाळासह स्वर्गवासी झाली आणि साडेतीन वर्षांच्या मुलाला माझ्याकडे सोडून गेली. मदर्स डेच्या शुभेच्छा, दीपिका!