Coronavirus: चिकन खाल्ल्याने कोरोना व्हायरसची लागण होते? केंद्र सरकारनं दिलं 'हे' उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 02:36 PM2020-02-11T14:36:07+5:302020-02-11T14:41:22+5:30
सध्या कोरोना व्हायरसची दहशत जगभरात पसरली आहे. या व्हायरसच्या कचाट्यात आतापर्यंत ४३ हजार नागरिक सापडले
नवी दिल्ली - चीनमध्ये मोठ्या प्रमाणात पसरत असलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतीय नागरिकांच्या मनात आहे. यात व्हायरसबाबत अनेक अफवांना उधाण आलं आहे. चिकन खाल्ल्याने कोरोना व्हायरसची लागण होईल अशी अफवा लोकांमध्ये पसरली आहे. त्यामुळे चिकन विक्रीतही घट झाली आहे. चिकन खाण्यापासून लोक दूर जात आहेत.
मात्र केंद्र सरकारकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. केंद्रीय पशुपालन मंत्री गिरीराज सिंह यांनी सांगितले की, लोकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, पोल्ट्री उत्पादनाशी कोरोना व्हायरसचा काहीही संबंध नाही, चिकन पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यामुळे लोकांनी चिकन खाणं टाळू नये. त्याचसोबत जगभरात कुठेही कोरोना व्हायरसचा संबंध पोल्ट्री उत्पादनाशी नाही तसेच त्या व्यवसायाशी संबंध असलेल्या कोणलाही कोरोनाची लागण झाली नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
भावा, हीच तर आपली मैत्री; पंतप्रधान मोदींच्या 'त्या' पत्राला चीनने दिलं उत्तर
याबाबत पशु उत्पादन मंत्रालयाकडून अधिकाऱ्यांना सांगण्यात आलं आहे की, लवकरच लोकांसाठी सूचना पत्र जारी करण्यात यावं. पोल्ट्री उत्पादनात कोरोना व्हायरस पसरतो या अफवेमुळे देशभरातील कृषी उद्योगाशी संबधित कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी पशुपालन मंत्री गिरीराज सिंह यांची भेट घेतली. या मुलाखतीनंतर याबाबत केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
चीन सरकार २०,००० कोरोनाग्रस्तांना मारणार?; जाणून घ्या बातमीमागचं सत्य
सध्या कोरोना व्हायरसची दहशत जगभरात पसरली आहे. या व्हायरसच्या कचाट्यात आतापर्यंत ४३ हजार नागरिक सापडले असून यातील १ हजारांपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये हा आजार मोठ्या प्रमाणात पसरला आहे. चीनच्या वुहान शहरात नागरिकांना घरामध्येच कैद करुन ठेवण्यात आलं आहे. भारतातही या आजाराचे काही रुग्ण आढळल्याची माहिती आहे.
मोदीसाहेब! माझ्या मुलाला वाचवा, जपानमध्ये अडकलेल्या लेकासाठी बापाची आर्त हाक
दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिनी अध्यक्ष शी जिनपिंग यांना पत्र लिहून कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी भारत मदत करण्यास तयार आहे असं सांगितले आहे. या पत्रात मोदींनी कोरोना व्हायरसच्या विरोधात आम्ही चीनमधील लोकांच्यासोबत आहोत. त्याचसोबत चीनच्या हुबेई प्रांतात अडकलेल्या ६५० भारतीयांना एअरलिफ्ट करण्यास मदत केल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी चीनफिंग यांचे कौतुकही केले होते. यावर चीनने भारताचं कौतुक करत तुम्ही करत असलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. पंतप्रधान मोदींच्या या पत्रामुळे चीनशी असलेल्या भारताच्या मैत्रीचे प्रतिबिंब उमटले असं चीनकडून सांगण्यात आलं.
हवेच्या माध्यमातून लोकांमध्ये पसरतोय कोरोना व्हायरस; शांघाय अधिकाऱ्यांचा दावा