CoronaVirus: 'इम्युनिटी'साठी औषधं, खास आहारामागे लागू नका, त्यापेक्षा...; 'पद्मश्री' डॉक्टरांचे मोलाचे बोल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 12:43 PM2020-03-29T12:43:32+5:302020-03-29T12:48:12+5:30

कोरोनाचा सर्वाधिक धोका ज्येष्ठ आणि लहान मुलांना आहे. ज्यांच्यात रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे त्यांचा जीव कोरोनामुळे जाण्याची शक्यता जास्त असते. 

CoronaVirus: Dr. Ranjan gangakhedkar talks about corona virus and prevention | CoronaVirus: 'इम्युनिटी'साठी औषधं, खास आहारामागे लागू नका, त्यापेक्षा...; 'पद्मश्री' डॉक्टरांचे मोलाचे बोल

CoronaVirus: 'इम्युनिटी'साठी औषधं, खास आहारामागे लागू नका, त्यापेक्षा...; 'पद्मश्री' डॉक्टरांचे मोलाचे बोल

Next

नवी दिल्ली - सध्या कोरोना व्हायरसमुळे हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. भारतात सुद्धा कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी भारतात २१ दिवसांचे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. कोरोनाचा सर्वाधिक धोका ज्येष्ठ आणि लहान मुलांना आहे. ज्यांच्यात रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे त्यांचा जीव कोरोनामुळे जाण्याची शक्यता जास्त असते. 

मग ही इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी काय करावं लागतं याबाबत लोकमतचे दिल्लीचे प्रतिनिधी टेकचंद सोनावणे यांनी आयसीएमआरचे संशोधक पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांची मुलाखत घेतली आहे. यात डॉक्टरांनी सांगितले की, घरातील लोकांना रक्तदाबाची, मधुमेहाची किंवा हृदयरोगाची समस्या असेल तर त्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी  सोशल डिस्टेंसिंग पाळणं गरजेचं आहे. हा आजार बरा करण्यासाठी कोणतंही औषध नाही तसंच लसही उपलब्ध नाही तेव्हा या आजाराचा धोका वाढवायचा नसेल तर कोरोनाची लागण होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. या आजाराची लक्षणं साधी आहेत. सर्दी, श्वास घेण्यास त्रास होणं, त्यामुळे लोकांच्या मनात भीती बसली आहे. ज्यामुळे जोपर्यंत जोखीम असेल तोपर्यंत तपासणी करून घेणं गरजेचं आहे. खासगी लॅबमध्ये पैसे जास्त जातात पण आरोग्यासाठी लवकरात लवकर चाचणी होणं गरेजेचे आहे असे ते म्हणाले. 

तसेच आजार जरी पटकन पसरणारा असला तरी मृत्यू दर कमी असू शकतो. कारण लॉकडाऊनची स्थिती ही सामान्य नाही. याआधी कधी सरकारने असं केल्याचं आपल्या ऐकण्यात नाही. कोरोनापासून वाचण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने स्वतःचा नाही तर संपूर्ण समाजाचा विचार करणं गरजेचं आहे. जे लोक लॉकडाऊन पाळत नाहीत अशा व्यक्तींना लॉकडाऊनचं महत्व समजावून सांगणं, त्यांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. जेव्हा आपण सरकारच्या आदेशाचं पालन न करता घराबाहेर पडतो. तेव्हा आपण आजाराला स्वतःच्या घरी येण्यासाठी निमंत्रण देतो. त्यामुळे समाज सुरक्षित राहणार नाही पण कुटुंबियांनां आणि प्रियजनानां सुद्धा आपण धोक्यात  घालत असतो. अशावेळी लॉकडाऊन पाळणं गरजेचं आहे असं डॉ. रमन गंगाखेडकर यांनी सांगितले.

दरम्यान, लोकांना असं वाटतयं की रोगप्रतिकारकशक्ती वाढवल्याने आपल्याला कोणत्याही प्रकारचा धोका होणार नाही. त्यासाठी लोक वेगवेगळे औषधं, गोळ्या आणि खाण्याचे पदार्थ बदलत आहेत. पण हे करण्यात अर्थ नाही. नको त्या गोष्टींचं पालन करण्यापेक्षा सरकार जे सांगत आहे त्या गोष्टींचं पालन केलं तर आपल्याला कोरोनावर मात करता येईल. यामध्ये आपल्याला जेवढा धोका वाटतो त्यापेक्षा जास्त धोका डॉक्टर, नर्स जे लोक उपाचार आणि तपासणी करत आहेत त्यांना आहे. लोकांचा जीव वाचवण्यासाठी ते प्रयत्न करतायेत. साध्या गोष्टींसाठी घाबरून जाऊ नका. मास्कचा सरसकट वापर करण्याची गरज नाही. आरोग्य विभागाशी निगडीत असाल तर मास्कचा वापर केलाच पाहिजे. सॅनिटायजर वापरण्यापेक्षा साबणाने स्वतःचा  हातअर्धा मिनिट धुतला तरी आजारापासून लांब राहता येऊ शकतं. लोकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं.

पाहा व्हिडीओ - 

Web Title: CoronaVirus: Dr. Ranjan gangakhedkar talks about corona virus and prevention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.