Coronavirus : ‘यामुळे’ हरियाणात च्युईंगम विक्रीवर 30 जूनपर्यंत राहणार प्रतिबंध
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2020 01:15 PM2020-04-03T13:15:20+5:302020-04-03T13:16:42+5:30
हरियाणा सरकारने गुटखा आणि पान मसालावरील प्रतिबंध प्रभावीपणे लागू करण्याचे प्रशासनाला आदेश दिले आहेत. राज्यातील फुड अँड ड्रग एडमिनिस्ट्रेशन विभागानुसार, कोरोना व्हायरस शिंक आणि खोकल्यासह तोडांतून बाहेर पडणाऱ्या जलकणांपासून पसरतो.
नवी दिल्ली - हरियाणा सरकारने कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्यात ३० जूनपर्यंत च्युइंगम विक्रीवर बंदी घातली आहे. लोक च्युइंगम खाऊन थुंकतात. त्यामुळे कोरोना व्हायरसचा प्रसार वेगाने होण्याची शक्यता, सरकारच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.
हरियाणा सरकारने गुटखा आणि पान मसालावरील प्रतिबंध प्रभावीपणे लागू करण्याचे प्रशासनाला आदेश दिले आहेत. राज्यातील फुड अँड ड्रग एडमिनिस्ट्रेशन विभागानुसार, कोरोना व्हायरस शिंक आणि खोकल्यासह तोडांतून बाहेर पडणाऱ्या जलकणांपासून पसरतो.
लोक च्युइंगम खाऊन सार्वजनिक थुंकतात. अशा स्थितीत कोरोना पसरण्याचा धोका अधिक वाढतो. त्यामुळे च्युंगमच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. या व्यतिरिक्त सुगंधीत तंबाखू, गुटखा, पान मसाला आणि खर्रा सुपारी, कत्था, चुन्याच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. उत्तर प्रदेश सरकारने याआधीच कोरोना व्हायरस रोखण्यासाठी पान मसाल्याच्या उत्पादन आणि विक्रीवर बंदी घातली आहे. पान मसाला खाऊन थुंकल्याने कोरोना व्हायरस पसरण्याची शक्यता वाढते, असं उत्तर प्रदेश सरकारचे म्हणणे आहे. मात्र तरी देखील अनेक ठिकाणी पान मसाल्याची सर्रास विक्री सुरू असल्याचे दिसून येत आहे.
चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे जगातील १८० हून अधिक देशांना फटका बसला आहे. दिवसागणिक कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. आतापर्यंत जगभरातील १० लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर मृतांचा आकडा ५३ हजारांपर्यंत पोहचला आहे. अमेरिका, इटली, स्पेन या देशांत कोरोनाचा प्रार्दुभाव जलदगतीने होत आहे.