CoronaVirus : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुलांवर किती परिणाम होणार? सर्व्हेच्या हवाल्यानं सरकारनं स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 08:03 PM2021-06-18T20:03:13+5:302021-06-18T20:05:55+5:30

आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर तिसऱ्या लाटेच्या धोक्यासंदर्भात अंदाज वर्तवले जात आहेत. सरकारचे वरिष्ठ आरोग्य सल्लागार आर. के. राघवन यांनी, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत सर्वाधिक फटका मुलांना बसू शकतो, असा अंदाज वर्तवला होता.

CoronaVirus During third wave how much it will impact on children know what health ministry says | CoronaVirus : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुलांवर किती परिणाम होणार? सर्व्हेच्या हवाल्यानं सरकारनं स्पष्टच सांगितलं

CoronaVirus : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुलांवर किती परिणाम होणार? सर्व्हेच्या हवाल्यानं सरकारनं स्पष्टच सांगितलं

googlenewsNext

नवी दिल्ली - देशात कोरोनाची दुसरी लाट आता ओसरताना दिसत आहे. देशभरातील कोरोना संक्रमितांच्या आकडेवारीचा विचार करता, संक्रमितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट होत आहे. मात्र, आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, कोरोना संक्रमितांच्या संख्येत घट होत असली तरी, अद्यापही धोका पूर्णपणे टळलेला नाही. (CoronaVirus During third wave how much it will impact on children know what health ministry says)

आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर तिसऱ्या लाटेच्या धोक्यासंदर्भात अंदाज वर्तवले जात आहेत. सरकारचे वरिष्ठ आरोग्य सल्लागार आर. के. राघवन यांनी, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत सर्वाधिक फटका मुलांना बसू शकतो, असा अंदाज वर्तवला होता. मात्र, जागतिक आरोग्य संघटना आणि एम्सच्या सर्व्हेतून जे आकडे समोर आले आहेत, ते नक्कीच दिलासादायक आहेत.

मुलांवर तिसऱ्या लाटेचा कितपत परिणाम? -   
नीती आयोगाचे सदस्य डॉक्टर व्ही. के. पॉल यांनी आरोग्य मंत्रालयाच्या नियमित पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले आहे, की डब्ल्यूएचओ आणि एम्सच्या सीरो सर्व्हेमध्ये जे आकडे समोर आले आहेत, यावरून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुलांवर फारसा परिणाम होणार नाही, हे स्पष्ट होते.

भीषण, भयंकर, भयावह! जगभरातील कोरोना बळींची संख्या 40 लाखांवर; 166 दिवसांत 20 लाख मृत्यू

पॉल म्हणाले, या सर्व्हेदरम्यान 18 वर्षांवरील आणि त्यापेक्षा कमी वय असलेल्या लोकांच्या सर्व्हेमध्ये सीरो पॉझिटिव्हिटी रेट जवळपास सारखाच होता. 18 वर्षांवरील लोकांत सीरो पॉझिटिव्हिटी रेट 67 टक्के आणि 18 पेक्षा कमी वस असलेल्या लोकांत हा रेट 59 टक्के आहे. शहरी भागांत 18 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या लोकांत 78 टक्के तर 18 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांत हा रेट 79 टक्के असल्याचे दिसून आले आहे.

सर्व्हेत सीरो- पॉझिटिव्हिटी रेट जवळपास सारखाच -
ग्रामीण भागांतील सर्व्हेदरम्यान 18 वर्षांखालील लोकांत सीरो पॉझिटिव्हिटी रेट 56 टक्के, तर 18 वर्षांवरील लोकांत 63 टक्के दिसून आला आहे. यावरून असे दिसून येते, की मुले कोरोना संक्रमित झाले, पण त्यांच्यावर फार कमी परिणाम झाला. तसेच, तिसऱ्या लाटेदरम्यान मुलांत संक्रमणाच्या काही केसेस समोर येऊ शकतात. 

CoronaVirus News: एका दगडात दोन पक्षी! कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका; पंतप्रधान मोदींकडून मोठी घोषणा

तसेच, आरोग्य विगाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी म्हटले आहे, की तिसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणावर मुले प्रभावित होतील, हे खरे नाही. कारण सीरो-सर्व्हे सर्व वयोगटातील लोकांसाठी सरखाच आहे. मात्र, असे असले तरी, सरकार तयारीत कुठल्याही प्रकारची कसर ठेवणार नाही. 

Web Title: CoronaVirus During third wave how much it will impact on children know what health ministry says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.