CoronaVirus News: कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सायकलला प्रोत्साहन द्या; केंद्राची राज्यांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 03:56 AM2020-06-14T03:56:41+5:302020-06-14T03:56:55+5:30

वाहतुकीचे व्यवहार व्हावेत विनारोकड

CoronaVirus Encourage cycling to prevent corona infection states to centre | CoronaVirus News: कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सायकलला प्रोत्साहन द्या; केंद्राची राज्यांना सूचना

CoronaVirus News: कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सायकलला प्रोत्साहन द्या; केंद्राची राज्यांना सूचना

Next

नवी दिल्ली : कोरोना साथीच्या काळात संसर्गापासून वाचण्यासाठी अनेक जण स्वत:च्या वाहनाने प्रवास करणे पसंत करत आहेत. मात्र सायकलसारख्या (ज्यात इंजिनाचा वापर नाही) वाहनांचा जास्तीत जास्त वापर करण्यास लोकांना प्रोत्साहन द्यावे, अशी सूचना केंद्राने राज्य सरकारांना केली आहे.

वाहतूक व्यवस्थेचे सर्व व्यवहार विनारोकड (कॅशलेस) व्हावेत यासाठी राज्य सरकारांनी प्रयत्न करायला हवेत असे केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटले आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरामध्ये सायकलस्वारांसाठी ४० मैलाचे नवे रस्ते बनविण्यात आले आहेत. आॅकलंडमध्ये १० टक्के रस्ते मोटरकार व अन्य वाहनांसाठी बंद करण्यात आले आहेत. त्या रस्त्यांवरून फक्त सायकलस्वार जाऊ शकतील. ही उदाहरणे गृह मंत्रालयाने राज्यांसमोर मांडली आहेत. विविध राज्ये व मेट्रो रेल्वे कंपन्यांना लिहिलेल्या एका पत्रात केंद्रीय गृह सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांनी म्हटले आहे की, सायकलीसारख्या वाहनांचा वापर वाढावा यासाठी देशपातळीवर प्रयत्न व्हायला हवेत. पाच किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी सायकलसारख्या वाहनाचा लोकांनी उपयोग केला तर त्याचे अनेक फायदे होतील. अशा वाहतूक व्यवस्थेला कमी मनुष्यबळ लागेल, ती वाहतूक व्यवस्था त्वरित अमलात आणता येईल. प्रदूषण अजिबात होणार नाही.

दीर्घकालीन उपाययोजना अमलात आणा
केंद्रीय गृह सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांनी सांगितले की, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी दीर्घकालीन तीन टप्प्यांची योजना आखायला हवी. त्यामध्ये सहा महिने, एक वर्ष व एक ते तीन वर्षांकरिता करावयाच्या उपाययोजनांची आखणी करावी. फिजिकल डिस्टन्सिंग तसेच स्वच्छतेचे नियम पाळून वाहतूक व्यवस्थेचे संचालन केले जावे. वाहतूक व्यवस्थेतील सर्व व्यवहार विनारोकड होण्यासाठी भीम, फोनपे, गुगल पे, पेटीएम, नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड आदी पयार्यांचा वापर करण्यात यावा.

प्रवासी क्षमता कमी
कोरोना साथीच्या काळात देशातील मेट्रो, बससेवेची २५ ते ५० टक्केच प्रवासी क्षमता उपयोगात आणावी असे केंद्राने राज्यांना सुचविले आहे.

Web Title: CoronaVirus Encourage cycling to prevent corona infection states to centre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.