धोका वाढणार? कोविड-19 नंतर आता कोविड-22 येण्याची शक्यता; असेल डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही घातक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 03:46 PM2021-08-24T15:46:54+5:302021-08-24T15:54:48+5:30
CoronaVirus : कोरोनाचा एक नवा व्हेरिएंट येण्याची दाट शक्यता आहे आणि तो टाळण्यासाठी आपण लसीवर अवलंबून राहू शकणार नाही, असे रेड्डी यांनी म्हटले आहे.
ज्यूरिक - कोरोना लस आणि प्रतिबंधात्मक उपाय, यांमुळे आज अनेक देशांनी मोठ्या प्रमाणावर व्हायरसवर नियंत्रण मिळविले आहे. असे असले तरी, कोरोना अजूनही आपल्या सभोवताली आहे आणि त्याचे स्वरूप बदलण्याचा धोकाही आहे. यामुळे, कोरोनाचे 'कोविड -22' नावाचा नवा व्हेरिएंट सध्याच्या सर्वात घातक डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही अधिक भयंकर असू शकतो, असा इशारा एका तज्ज्ञाने दिला आहे.
लसीवर अवलंबून राहून चालणार नाही -
ETH Zurich येथी इम्युनोलॉजिस्ट, प्राध्यापक डॉ. साई रेड्डी यांनी म्हटले आहे, की सध्या अस्तित्वात असलेल्या स्ट्रेन्सच्या संयोगामुळे महामारीचा एक नवा आणि अधिक धोकादायक टप्पा येऊ शकतो. एवढेच नाही, तर कोरोनाचा एक नवा व्हेरिएंट येण्याची दाट शक्यता आहे आणि तो टाळण्यासाठी आपण लसीवर अवलंबून राहू शकणार नाही, असेही रेड्डी यांनी म्हटले आहे. जर्मन वृत्तपत्र ब्लिकसोबत बोलताना प्रोफेसर रेड्डी म्हणाले, कोविड-21 म्हणून ओळखला जाणारा कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट हा आतापर्यंतचा सर्वाधिक संसर्गजन्य व्हेरिएंट होता.
दिलासादायक! राज्याचा रिकव्हरी रेट ९७.०५ टक्के; गेल्या २४ तासांत ६,७९५ रुग्ण कोरोनामुक्त
महामारीच्या सर्वात घातक फेजची शक्यता -
रेड्डी म्हणाले, जर बीटा किंवा गॅमा व्हेरिएंट अधिक संसर्गजन्य झाले अथवा डेल्टाने म्यूटेशन विकसित केले, तर आपण साथीचा एक नवीन टप्पा पाहू शकतो. येत्या काळात ही एक मोठी समस्या बनू शकते. कोविड -22 सध्या आपण जे अनुभवत आहोत त्यापेक्षा वाईट असू शकते. एवढेचन नाही, तर डेल्टा व्हेरिएंटचा व्हायरल लोड अत्यंत जास्त आहे, असे नुकत्याच झालेल्या वैज्ञानिक अभ्यासांच्या निकालावरून दिसून येते.
''तिसऱ्या लाटेचा प्रभाव फारसा नाही जाणवणार, ऑक्टोबरपर्यंत ही राज्ये कोरोनामुक्त होणार’’, तज्ज्ञांचा
लोकांना सुपर स्प्रेडर बनवतो डेल्टा -
रेड्डी म्हटले, जर लसीकरण न झालेली एखादी व्यक्ती त्याच्या संपर्कात आली, तर ती 'सुपर-स्प्रेडर' बनू शकते. म्हणजेच संसर्ग वेगाने पसरवू शकतो. तसेच, 12 वर्षांपर्यंतच्या मुलांना ही लस दिली जात नाही. त्यामुळे तो सुपर स्प्रेडरचा मोठा गट ठरू शकतो. आपण उच्च पातळीवरील अँटीबॉडीजच्या सहाय्याने याचा सामना करू शकतो आणि बूस्टर डोस हेच करते, असेही रेड्डी यांनी म्हटले आहे.