Coronavirus : बापरे! भूक भागवण्यासाठी मुलं खातात बेडूक, जाणून घ्या व्हायरल Video मागचं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 01:31 PM2020-04-21T13:31:13+5:302020-04-21T13:31:29+5:30

Coronavirus : लॉकडाऊनमुळे काही ठिकाणी लोकांवर उपासमारीची वेळ आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अशातच काही दिवसांपूर्वी भूक भागवण्यासाठी लहान मुलं बेडूक खात असल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला होता.

Coronavirus fact check claim children in jehanabad bihar are eating frogs SSS | Coronavirus : बापरे! भूक भागवण्यासाठी मुलं खातात बेडूक, जाणून घ्या व्हायरल Video मागचं सत्य

Coronavirus : बापरे! भूक भागवण्यासाठी मुलं खातात बेडूक, जाणून घ्या व्हायरल Video मागचं सत्य

Next

जहानाबाद - जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतात सुद्धा कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत होत आहे. कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. आतापर्यंत देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 18 हजारांवर वर पोहचली आहे. तर 590 लोकांचा मृत्यू झाला आहे. याच दरम्यान लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्यांचे हाल होत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. 

लॉकडाऊनमुळे काही ठिकाणी लोकांवर उपासमारीची वेळ आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अशातच काही दिवसांपूर्वी भूक भागवण्यासाठी लहान मुलं बेडूक खात असल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला होता. मात्र आता या व्हायरल झालेल्या व्हिडीओमागचं सत्य समोर आलं आहे. बिहारच्या जहानाबादमधील हा व्हिडीओ असून तो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आणि एकच खळबळ उडाली. आमच्या घरातील अन्नधान्य संपले आहे. त्यामुळे भूक भागवण्यासाठी आम्ही बेडूक पकडून खात असल्याची माहिती व्हिडीओमध्ये लहान मुलांनी दिली होती. 

बिहारमधील मुलांचा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली. तसेच तातडीने तपास करण्यात आला. त्यानंतर जहानाबादच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी या व्हिडीओतील माहितीचे खंडन केले आहे. तसेच प्रेस इन्फर्मेशन ब्यूरोने (पीआयबी) देखील व्हिडीओतील माहिती खोटी असल्याचं म्हटलं आहे. बिहारच्या आयपीआरडी (माहिती व जनसंपर्क विभाग) च्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला यामध्ये व्हिडीओबाबतची खरी माहिती देण्यात आली आहे.

भूक भागवण्यासाठी जी मुलं बेडूक खाताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्याच्या घरी जेव्हा अधिकारी तपासासाठी पोहोचले तेव्हा वेगळीच माहिती समोर आली. मुलांच्या घरी पुरेसे अन्नधान्य उपलब्ध होते. 'बेडूक पकडून मुलांनी खाल्ला या बातमीच्या चौकशीत त्या मुलांच्या घरात पुरेसे अन्न असल्याचं उघड झालं आहे. काही बेजबाबदारांनी लोकांनी बेडूक खाण्याचा व्हिडीओ मुद्दाम सोशल मीडियावर व्हायरल करून जहानाबाद डीएमची प्रतिमा मलीन केल्याचा प्रयत्न केला आहे' असं ट्विट बिहारच्या आयपीआरडी करून याबाबतची खरी माहिती दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : ... तर चीनला मोठा फटका बसणार, तब्बल 1000 कंपन्या भारतात येणार

Coronavirus : चिंताजनक! देशात 24 तासांत 1,336 नवे रुग्ण, 47 जणांचा मृत्यू

Coronavirus : 'माझ्या वडिलांना वाचवा'... लेकीची पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना विनवणी; Video पाहून व्हाल भावूक

Coronavirus : ...अन् रुग्णाची प्रकृती सुधारली, कोरोनाच्या उपचारात 'ही' थेरपी आशेचा किरण ठरली

 

Web Title: Coronavirus fact check claim children in jehanabad bihar are eating frogs SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.