Coronavirus : धक्कादायक! लॉकडाऊनमुळे धान्य विकण्यात अडचण, शेतकऱ्याची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 04:23 PM2020-04-10T16:23:36+5:302020-04-10T16:45:05+5:30
Coronavirus : शेतात अन्नधान्य पिकवलं होतं. मात्र लॉकडाऊनमुळे ते विकण्यात अडचण येत असल्याने त्याने कंटाळून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलले आहे.
तुमकूरू - कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. भारतात सुद्धा कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत होत आहे. कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन सुरू आहे. आतापर्यंत देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6000 वर पोहचली आहे. तर 160 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. फक्त जीवनावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. याच दरम्यान काही धक्कादायक घटना समोर येत आहेत. लॉकडाऊनच्या काळात अन्नधान्य विकण्यात अडचण येत असल्यामुळे एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकच्या तुमकूर जिल्ह्यात ही घटना घडली. गंगाधर असं या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. लॉकडाऊनच्या काळात अन्नधान्य विकण्यात अडचण येत असल्यामुळे शेतकऱ्याने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्याने आपल्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तसेच या शेतकऱ्याने बँकेकडून चार लाखांपेक्षा जास्त कर्ज घेतलं होतं. याव्यतिरीक्त शेतीच्या कामांसाठी स्थानिक सावकारांकडूनही शेतकऱ्याने पैसे घेतले होते.
Coronavirus : ...म्हणून 'या' देशाने थांबवला हायड्रोक्सीक्लोरोक्वीनचा वापरhttps://t.co/65G47KmrZq#CoronaLockdown#coronavirus
— Lokmat (@MiLOKMAT) April 10, 2020
गंगाधरने कर्ज घेतले होते. त्याने आपल्या शेतात अन्नधान्य पिकवलं होतं. मात्र लॉकडाऊनमुळे ते विकण्यात अडचण येत होती. पिकवलेलं अन्नधान्य कोणी विकत घेत नसल्याने त्याने कंटाळून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. तर दुसरीकडे लॉकडाऊनमध्ये पत्नीला भेटता येत नसल्यामुळे एकाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या गोंडामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पत्नीच्या विरहामुळे पतीने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं आहे. घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
Coronavirus : दिलासादायक! भारतातील तब्बल 400 जिल्हे कोरोनामुक्तhttps://t.co/a2itsKwcgj#coronaupdatesindia#CoronaLockdown
— Lokmat (@MiLOKMAT) April 10, 2020
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : दिलासादायक! भारतातील तब्बल 400 जिल्हे कोरोनामुक्त
Coronavirus : ...म्हणून 'या' देशाने थांबवला हायड्रोक्सीक्लोरोक्वीनचा वापर
coronavirus : अमेरिका, युरोपमध्ये कोरोनाचे थैमान थांबता थांबेना, जगभरात 90 हजारांहून अधिक मृत्युमुखी
CoronaVirus: दिलासादायक! कोरोनाबद्दलची 'ही' आकडेवारी वाचून तुम्हालाही बरं वाटेल