CoronaVirus : धक्कादायक...! कोरोनामुळे वडिलांचा मृत्यू; मुलीनं जळत्या चितेवर घेतली उडी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 09:08 PM2021-05-04T21:08:08+5:302021-05-04T21:10:28+5:30

73 वर्षीय दामोदरदास शारदा यांचा मंगळवारी सकाळी कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांना रविवारी बारमेर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

CoronaVirus Father died by covid-19 daughter jumped into burning pyre in rajasthan barmer | CoronaVirus : धक्कादायक...! कोरोनामुळे वडिलांचा मृत्यू; मुलीनं जळत्या चितेवर घेतली उडी

CoronaVirus : धक्कादायक...! कोरोनामुळे वडिलांचा मृत्यू; मुलीनं जळत्या चितेवर घेतली उडी

Next

बारमेर - राजस्थानातील बारमेर जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे कोरोनामुळे वडिलांचा मृत्यू झाल्याने दुःखी मुलीने चितेत उडी घेतली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटना स्थळी पोहोचले आणि त्यांनी संबंधित मुलीला सरकारी रुग्णालयात नेले. येथून तिला जोधपूर येथे पाठविण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 73 वर्षीय दामोदरदास शारदा यांचा मंगळवारी सकाळी कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांना रविवारी बारमेर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मृत्यूनंतर रुग्णालय प्रशासनाने त्यांचा मृतदेह कोविड-19 प्रोटोकॉलनुसार त्यांच्या कुटुंबीयांकडे अंत्यसंस्कारासाठी सोपवला होता.

CoronaVirus : कसा करायचा करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना? अँथनी फाउचींनी भारताला दिला महत्वाचा सल्ला!

बारमेर सिटी पोलीस ठाण्याचे प्रभारी प्रेम प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत दामोदरदास यांना तीन मुली आहेत. त्यांच्या सर्वात छोट्या मुलीने अंत्यसंस्कारादरम्यान स्मशानभूमीत जाण्याचा हट्ट धरला. कारण त्यांच्या कुटुंबात कुणीही पुरूष सदस्य नही. पोलिसांनी सांगितले, की अंत्यसंस्कारावेळी चंद्रकला (34) यांनी अचानकच वडिलांच्या जळत्या चितेवर उडी घेतली.

यावेळी तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी तिला कसे-बसे बाहेर काढले आणि पोलीस तथा रुग्णवाहिकेला माहिती दिली. यानंतर त्यांना बारमेर येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, चंद्रकला या 70 टक्के भाजल्या आहेत. प्रथमोपचारानंतर त्यांना जोधपूर येथे हलविण्यात आले आहे.

CoronaVirus: चिंताजनक! भारतात मे नंतर आणखी हाहाकार माजवणार कोरोना, वैज्ञानिकांचा दावा!

Web Title: CoronaVirus Father died by covid-19 daughter jumped into burning pyre in rajasthan barmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.