coronavirus: कोरोनाची दहशत, सूर्योदयापूर्वीच गाव सोडून जंगलात पळतात गावकरी आणि...  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 05:38 PM2021-04-28T17:38:40+5:302021-04-28T17:42:41+5:30

coronavirus News: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाचा विषाणूने ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात शिरकाव केल्याने गावकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

coronavirus: Fear of Coronavirus, villagers flee the village before sunrise and run into the forest | coronavirus: कोरोनाची दहशत, सूर्योदयापूर्वीच गाव सोडून जंगलात पळतात गावकरी आणि...  

coronavirus: कोरोनाची दहशत, सूर्योदयापूर्वीच गाव सोडून जंगलात पळतात गावकरी आणि...  

Next

जयपूर - कोरोना विषाणूच्या फैलावामुळे सध्या देशभरात भीतीचे वातावरण आहे. दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाचा विषाणूने ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात शिरकाव केल्याने गावकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. (coronavirus in India) दरम्यान, राजस्थानमधील झालावाड जिल्ह्यातील ग्रामस्थ कोरोनामुळे एवढे भयभीत झाले आहेत की, ते घर सोडून जंगलात पळू लागले आहेत. संकटकाळात जंगलात वास्तव्य करण्याच्या प्राचीन परंपरेचा आधार घेत गावकरी दिवसभर जंगलात राहतात. हे गावकरी रात्री गावात परततात. या काळात संपूर्ण दिवसभर गावात येण्याची किंवा परत जाण्याची कुणालाही परवानगी नसते. (Fear of Coronavirus, villagers flee the village before sunrise and run into the forest )

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा झालावाड जिल्ह्यालाही बसला आहे. जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाचे ५०५ नवे रुग्ण सापडले आहेत. तसेच दररोज अनेक कोरोनाबाधित रुग्ण कोरोनाची शिकार होत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

जंगलातील वास्तव्यादरम्यान, डग परिसरातील ग्रामीण भागातील गावकरी कोरोनापासून बचाव करण्यासाठी उपचारांसोबत अन्य उपायही करत आहेत. हे गावकरी दिवसभर गाव सोडून बाहेर जंगलांमध्ये राहतात. तिथेच भोजन बनवून खातात. तसेच दिवसभर जंगलात होमहवन, यज्ञ, पूजा, अभिषेक आदी कार्यक्रम करतात. हे ग्रामस्थ सूर्योदय होण्यापूर्वी जंगलात जातात आणि सूर्यास्त झाल्यावर परत गावात येतात. 

गावकऱ्यांनी सांगितले की, हा उपाय ते माताजींच्या सूचनेनुसार करत आहेत. या सर्व कार्यक्रमादरम्यान, गावात कुणालाही येण्याची किंवा गावातून बाहेर जाण्याची परवानगी दिली जात नाही. त्यासाठी गावातील तरुण मंडळी गावाच्या सीमेबाहेर लाठ्या काठ्या घेऊ पहारा देतात.  यावेळ जंगलामध्येच भजन कीर्तन करून कोरोनाला पळवून लावण्यासाठी ईश्वराकडे प्रार्थना केली जाते.  

Web Title: coronavirus: Fear of Coronavirus, villagers flee the village before sunrise and run into the forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.