coronavirus: लस येईपर्यंत कोरोनाविरोधातील लढाई कायम ठेवावी लागेल, मोदींचे आवाहन
By बाळकृष्ण परब | Published: October 20, 2020 06:35 PM2020-10-20T18:35:37+5:302020-10-20T18:54:37+5:30
Narendra Modi : लॉकडाऊन संपला आहे, पण कोरोना नाही. त्यामुळे लस येईपर्यंत कोरोनाविरोधातील लढाई कायम ठेवावी लागेल असे आवाहन मोदींनी केले आहे.
नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये लक्षणिय घट होत आहे. त्यामुळे दैनंदिन व्यवहारात मोठ्या प्रमाणात बेफिकिरी वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित करत महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे. लॉकडाऊन संपला आहे, पण कोरोना नाही. त्यामुळे लस येईपर्यंत कोरोनाविरोधातील लढाई कायम ठेवावी लागेल असे आवाहन मोदींनी केले आहे.
देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, गेल्या काही महिन्यांत कोरोनाविरोधातील लढाईत देशाने मोठा टप्पा पार केला आहे. इतर देशाच्या तुलनेत भारतातील स्थिती चांगली आहे. हळूहळू बाजारातील लगबग वाढत आहे. मात्र याच काळात देशात बेफिकीरी वाढत आहे. हल्लीच असे काही फोटो आणि व्हिडिओ दिसून आलेत. ज्यामध्ये लोक पुरेशी काळजी घेताना दिसत नाही आहेत. ही बाब योग्य नाही. काही बेजबाबदार लोक स्वत:ला आणि आपल्या कुटुंबालाही धोक्यात घालतात. आता सणावाराचे दिवस आहेत. मात्र थोडीशी बेफिकीरी जीवन उद्ध्वस्त करू शकते. तुम्ही तुमचे कुटुंबीय सुरक्षित, सुखी दिसावे, अशी माझी इच्छा आहे. अमेरिका आणि युरोपमध्ये कोरोनाच्या रुग्णांत घट झाल्यानंतर अचानक वाढ झाल्याचे दिसून येत आहे, ही बाब आपण लक्षात ठेवली पाहिजे.
#WATCH: Prime Minister Narendra Modi urges citizens to follow #COVID19 appropriate behaviour, appeals to them with folded hands.
— ANI (@ANI) October 20, 2020
"I pray to all of you, I want to see all of you safe and your families happy. I want to see festivals bring cheer your lives," says PM. pic.twitter.com/TRiFYKxDjr
लॉकडाऊन संपला आहे, पण कोरोना नाही. कोरोना विषाणूचा फैलाव वाढू नये यासाठी खबरदारी घेतली पाहिजे. कोरोनाविरोधातील लस अजून आलेली नाही. त्यामुळे लस येईपर्यंत कोरोनाविरोधातील लढाई कायम ठेवावी लागेल, असे आवाहन मोदींनी केले आहे.
All countries are working on a war-footing for making #COVID19 vaccine. Government is preparing for making the vaccine accessible to every Indian as soon as it is made available: Prime Minister Narendra Modi pic.twitter.com/pva6fUWP4f
— ANI (@ANI) October 20, 2020
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाविरोधात देशात करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबतही माहिती दिली. मोदी म्हणाले की, कोरोना काळात कोरोनाबाधित रुग्णांसाठी ९० लाखांहून अधिक बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच १२ हजार क्वारेंटाइन सेंटर उभारण्यात आली आहेत. देशात सध्या २० कोरोना चाचणी करणाऱ्या लॅब आहेत. तसेच देशात आतापर्यंत झालेल्या कोरोना चाचण्यांचा आकडा लवकरच १० कोटींचा टप्पा पार करणार आहेत.
India has a facility of more than 90 lakh beds for #COVID19 patients. There are 12,000 quarantine centres, around 2000 Corona testing labs. Number of tests will cross 10 Crores soon. In our fight against COVID, rise in the number of tests has been our strength: PM Narendra Modi. pic.twitter.com/t59McoYnQ6
— ANI (@ANI) October 20, 2020