CoronaVirus News : पीएम केअर फंडाविरोधात ट्विट करणं काँग्रेसला भोवलं; थेट सोनिया गांधींवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 04:03 PM2020-05-21T16:03:17+5:302020-05-21T16:10:36+5:30
त्या प्रकरणी आता थेट काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवी दिल्लीः कोरोनाचं थैमान दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णसंख्याही वाढत आहे. कोरोनासारख्या समस्येचा सामना करण्यासाठी मोदींनी पीएम केअर्सची घोषणा केली. त्याला अनेक उद्योगपती आणि दानशूर व्यक्तींनी सढळ हस्ते मदत केली. याच पंतप्रधानांच्या पीएम केअर्स फंडाविरोधात काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून एक ट्विट करण्यात आलं होतं. त्या प्रकरणी आता थेट काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कर्नाटकातील भाजपा कार्यकर्ते प्रवीण के. वी. नावाच्या व्यक्तीनं सोनिया गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शिवगोमा पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. 11 मे रोजी पीएम केअर फंडाबद्दल काँग्रेसच्या ट्विटर हॅण्डलवरून ट्विट करण्यात आलं होतं, त्याप्रकरणी आता गुन्हा दाखल झाला आहे. FIRमध्ये ट्विटर हॅण्डल सोनिया गांधी चालवत असल्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. पीएम केअर फंडात जमा झालेल्या पैशावरून काँग्रेसनं सरकारवर कोणती टीका केली होती, याचीच चर्चा आता रंगू लागली आहे.
काही ट्विटमधून पीएम केअर फंडात पारदर्शकता नसल्याची टीका करण्यात आली होती. पीएम केअर फंडाला मदत देणाऱ्या भारतीयांना या निधीतून केलेल्या कामाची माहिती व्हायला नको का?,” अशा प्रकारचंही एक ट्विट करण्यात आलं होतं. या सर्व ट्विटच्या हवाल्यानं हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पीएम केअर फंडाला पीएम केअर फ्रॉड म्हटले गेल्याची एफआयआरमध्ये नोंद आहे. असे सांगून कॉंग्रेसने कोरोना संकटात सरकारविरोधात अफवा पसरविल्याचाही आरोप करण्यात आला आहे. कॉंग्रेसच्या ट्विटर हँडलवरून मिळवलेल्या माहितीच्या आधारे त्यांनी सोनिया गांधींविरोधात एफआयआर दाखल केला आहे.
हेही वाचा
घाबरू नका! पुन्हा येणाऱ्या कोरोना लाटेचं आता नो टेन्शन, अभ्यासात नवा खुलासा
...म्हणून रशियातल्या 'त्या' नर्सनं पीपीईखाली फक्त अंतर्वस्त्रं घातली; कारण वाचून व्हाल अवाक्
नोकियाचा वर्ल्ड रेकॉर्ड; प्रतिस्पर्धी कंपन्यांना धोबीपछाड
देशाच्या सार्वभौमत्व अन् प्रादेशिक अखंडतेत कोणतीही तडजोड नाही, भारतानं नेपाळला सुनावलं
पाकला चुना! चिनी कंपन्यांनी 60 अब्जांची गुंतवणूक करून कमावला 400 अब्ज रुपयांचा नफा
...म्हणून चीन अफवा पसरवतो, डोनाल्ड ट्रम्प यांनी साधला निशाणा
एका कुटुंबाला कचऱ्यात सापडल्या दोन बॅगा अन् उघडून पाहतात तर काय...
CoronaVirus News : चीन अन् इटलीच्या तुलनेत भारतातून येणारा कोरोना 'प्राणघातक', नेपाळच्या PMची टीका