Coronavirus: दिलासादायक! कोरोनाविरुद्ध पहिला नेजल स्प्रे भारतात दाखल; जाणून घ्या माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 03:52 PM2022-02-09T15:52:50+5:302022-02-09T15:54:22+5:30
हा नेजल स्प्रे नायट्रिक ऑक्साईडवर आधारित आहे जे नाकाच्या वरच्या पृष्ठभागावरील कोरोना विषाणू प्रभावीपणे नष्ट करण्यासाठी कार्य करते.
नवी दिल्ली – गेल्या २ वर्षापासून कोरोना महामारीनं बहुतांश देशांची चिंता वाढवलेली आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सध्या लसीकरण हा एकमेव पर्याय उपलब्ध आहे. मात्र बुधवारी ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स आणि कॅनडाई बायोटेक कंपनीनं नेजल स्प्रे बाजारात आणला आहे. कोरोनातून बरा करणारा पहिला नेजल स्प्रे बनून तयार झाला आहे.
हा स्प्रे कोविड १९ संक्रमित वयस्क लोकांच्या उपचारासाठी प्रभावी ठरणार आहे. कोरोना संक्रमण गंभीर होणाऱ्या रुग्णांसाठी हा स्प्रे आहे. भारतात डीसीजीआयनं या स्प्रेच्या आपत्कालीन वापराला परवानगी दिली आहे. फैब्रीस्प्रे नावाच्या स्प्रे ला नाकाच्या आतमध्ये कोविड १९ व्हायरस नष्ट करण्यासाठी बनवलं आहे. जेणेकरुन हा व्हायरस फुस्फुस्सापर्यंत पोहचू नये. ग्लेनमार्कला देशाच्या औषध नियामक संस्था, औषध नियंत्रक जनरल (DCGI) कडून उत्पादन आणि वितरणाची मंजुरी त्वरित मंजूरी प्रक्रियेअंतर्गत प्राप्त झाली आहे.
नाकातच व्हायरसवर हल्ला
कंपनीचा असा विश्वास आहे की, हा नेजल स्प्रे नायट्रिक ऑक्साईडवर आधारित आहे जे नाकाच्या वरच्या पृष्ठभागावरील कोरोना विषाणू प्रभावीपणे नष्ट करण्यासाठी कार्य करते. जेव्हा नाकाच्या आतील त्वचेवर हा स्प्रे मारला जातो तेव्हा नायट्रिक ऑक्साईड व्हायरसला फुफ्फुसात पोहोचण्यापासून प्रतिबंधित करते. नेजल स्प्रे हे COVID-19 साठी एक प्रभावी आणि सुरक्षित अँटीव्हायरल उपचार आहे. ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेडचे मुख्य व्यावसायिक अधिकारी रॉबर्ट क्रॉकार्ट म्हणाले, “आम्हाला विश्वास आहे की ते रुग्णांना अत्यंत आवश्यक आणि वेळेवर वैद्यकीय पर्याय प्रदान करेल.
महामारी विरुद्धच्या लढ्यात प्रभावी
चाचणी दरम्यान, स्प्रेचे सूक्ष्मजीव गुण ओळखले गेले, ज्याने हे सिद्ध केले की, जेव्हा हा स्प्रे नाकाच्या आतील त्वचेवर फवारले जाते तेव्हा ते शरीरात विषाणूची वाढ होण्यापासून प्रतिबंधित करते. कोविड महामारीविरुद्धच्या लढाईत कंपनी म्हणून आम्ही भारतासोबत आहोत याचा आम्हाला आनंद आहे. SaNotize भारतात लॉन्च करताना आम्हाला खूप आनंद होत आहे असं ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेडचे सीईओ रॉबर्ट क्रोकार्ट म्हणाले.