कोरोना संकटात मोठी मदत; इंग्लंडमधून भारतात पोहोचली 100 व्हेंटिलेटर, 95 ऑक्सिजन काँसंट्रेटरची पहिली खेप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 02:54 PM2021-04-27T14:54:43+5:302021-04-27T15:17:10+5:30

इंग्लंडचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन म्हणाले, ‘‘या घातक व्हायरसपासून जीव वाचविण्यासाठी शेकडो ऑक्सिजन काँसंट्रेटर आणि व्हेंटिलेटरसह, आता महत्वाचे वैद्यकीय उपकरणे भारतात पोहोचण्याच्या मार्गावर.

CoronaVirus First shipment of corona medical supplies from England to india arrived today including 100 ventilators and 95 oxygen concentrators | कोरोना संकटात मोठी मदत; इंग्लंडमधून भारतात पोहोचली 100 व्हेंटिलेटर, 95 ऑक्सिजन काँसंट्रेटरची पहिली खेप

कोरोना संकटात मोठी मदत; इंग्लंडमधून भारतात पोहोचली 100 व्हेंटिलेटर, 95 ऑक्सिजन काँसंट्रेटरची पहिली खेप

googlenewsNext

नवी दिल्ली - कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी इंग्लंडवरून व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन काँसंट्रेटरची पहिली खेप भारतात पोहोचली आहे. हे साहित्य सोमवारी सायंकाळी रवाना करण्यात आले होते. इंग्लंड सरकारच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'एफसीडीओ'कडून मिळालेल्या पुढच्या खेपेची व्यवस्था या आठवड्यादरम्यान करण्यात येत आहे. यात 9 एअरलाइन कंटेनर लोडचा समावेश असेल. (First shipment of corona medical supplies from England to india arrived today including 100 ventilators and 95 oxygen concentrators)

यात 495 ऑक्सीजन काँसंट्रेटर, 120 Non-invasive व्हेंटिलेटर आणि 20 मॅन्युअल व्हेंटिलेटर्सचा समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या तत्काळ आवश्यक असलेल्या उपकरणांचा पुरवठा लवकरात लवकर करण्यावर लक्ष आहे. दीर्घकाळासाठी भारतातील गरजा आणि आवश्यकता पूर्ण करण्यासाठी सरकारी विभाग, दोन्ही देशांचे उच्चायोग आणि इंग्लंडमधील मूळ भारतीयांच्या समुहांत चर्चा सुरू आहे.

"शव जाळले जात आहेत अन् यांना रक्ताची 'खुशबू' येतेय; कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला PM मोदीच जबाबदार"

गेल्या आठवड्याच्या अखेरीस एफसीडीओने घोषणा केली होती, की भारत सरकारसोबत चर्चा केल्यानंतर कोरोनाविरोधातील लढाईत भारताला मदत करण्यासाठी 600हून अधिक महत्वाचे वैद्यकीय उपकरणे भारतात पाठविले जातील.


बोरीस जॉन्सन म्हणाले, इंग्लंड मित्र आणि सहकाऱ्याप्रमाणे भारतासोबत -
इंग्लंडचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन म्हणाले, ‘‘या घातक व्हायरसपासून जीव वाचविण्यासाठी शेकडो ऑक्सिजन काँसंट्रेटर आणि व्हेंटिलेटरसह, आता महत्वाचे वैद्यकीय उपकरणे भारतात पोहोचण्याच्या मार्गावर आहेत. तसेच या कठीन प्रसंगात इंग्लंड एक ‘‘मित्र आणि सहकाऱ्या’’च्या रुपात भारतासोबत उभा आहे." इंग्लंडचे परराष्ट्रमंत्री डोमिनिक राब यांनी, भारत एक अत्यंत महत्वाचा भागिदार असल्याचे म्हटले आहे. त्यांनी सोमवारी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्यासोबत चर्चा केली.

CoronaVirus: धोकेबाज ड्रॅगन! चीननं आधी पुढे केला मदतीचा हात, आता भारताचा मेडिकल सप्लाय रोखला

देशातील नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत घट -
देशात दररोज सापडणाऱ्या कोरोनाबाधितांच्या (Corona patient) संख्येत आज घसरण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून साडे तीन लाखांवर हे रुग्ण सापडू लागले होते. मात्र, आजच्या आकड्याच तब्बल 29,847 ची घसरण झाल्याने, हा दुसऱ्या लाटेत सापडलेल्या देशवासियांसाठी एक मोठा दिलासा आहे. सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीमध्ये 3,52,991 नवे रुग्ण आढळले होते. तर कोरोनामुळे 2812 जणांचा मृत्यू झाला होता. मृतांचा आकडा आजवरचा सर्वाधिक आकडा होता. तसेच आतापर्यंत 2,19,272 रुग्ण बरे झाले आहेत.

Corona Vaccine: मोठी बातमी! केंद्र सरकार परदेशातून लशींची आयात करणार नाही, राज्यांवर सोडला निर्णय

Web Title: CoronaVirus First shipment of corona medical supplies from England to india arrived today including 100 ventilators and 95 oxygen concentrators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.