Coronavirus: पहिल्यांदाच देशात ४ लाखांहून अधिक काेराेना रुग्ण बरे; ४,२२,४३६ रुग्ण एकाच दिवसात बरे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 06:18 AM2021-05-19T06:18:41+5:302021-05-19T06:19:00+5:30

कोरोनामुळे संसर्ग होणाऱ्या नव्या रुग्णांचा आलेख गेल्या काही दिवसांपासून घटत आहे.

Coronavirus: For the first time in the country, more than 4 lakh coronavirus patients are cured | Coronavirus: पहिल्यांदाच देशात ४ लाखांहून अधिक काेराेना रुग्ण बरे; ४,२२,४३६ रुग्ण एकाच दिवसात बरे

Coronavirus: पहिल्यांदाच देशात ४ लाखांहून अधिक काेराेना रुग्ण बरे; ४,२२,४३६ रुग्ण एकाच दिवसात बरे

Next

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी रोज आढळणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठलेला असताना आता कोरोनातून बरे होणाऱ्यांचाही विक्रम झाला आहे. देशात प्रथमच चार लाखांहून अधिक कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. सलग दुसऱ्या दिवशी नव्या रुग्णांची संख्या ३ लाखांच्या आत नोंदविण्यात आली, तर चार लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये तब्बल ४ हजार ३२९ जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनामुळे संसर्ग होणाऱ्या नव्या रुग्णांचा आलेख गेल्या काही दिवसांपासून घटत आहे. २ महिन्यांनी अडीच लाखांच्या जवळपास नवे रुग्ण नोंदविले आहेत. यापूर्वी २० एप्रिलला २ लाख ५९ हजार नवे रुग्ण नोंदविण्यात आले होते. 

या राज्यांमध्ये चढता आलेख
विधानसभा निवडणूक झालेल्या राज्यांमध्ये रुग्ण वाढत आहेत. तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, केरळ व पुदुच्चेरीमध्ये आलेख चढताच आहे. ओडिशा, आंध्र प्रदेशसह ईशान्येकडील राज्यांतही रुग्णसंख्या वाढत आहे.

मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्या हजाराखाली
मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या तीव्र लाटेनंतर पहिल्यांदाच दैनंदिन रुग्णसंख्या हजारांच्या खाली गेल्याची नोंद झाली आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात मंगळवारी महाराष्ट्राने २ कोटींचा टप्पा ओलांडला. एवढ्या मोठ्या संख्येच्या नागरिकांना लसीकरण करणारे महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य ठरले आहे. साेमवारी राज्यात १२३९ लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून सुमारे ९९,६९९ नागरिकांना लस देण्यात आली. महाराष्ट्राने आतापर्यंत २ कोटी ९० हजार लाभार्थ्यांचे लसीकरण केल्याची माहिती आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली.
 

Web Title: Coronavirus: For the first time in the country, more than 4 lakh coronavirus patients are cured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.