Coronavirus: तपासासाठी मस्जीदमध्ये गेलेल्या पोलिसांवर दगडफेक, चौघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2020 05:29 PM2020-04-01T17:29:29+5:302020-04-01T17:30:12+5:30

तबलीगी जमातीमध्ये सहभागी झालेले नागरिक पोलिसांशी सहकार्याच्या भूमिकने वागत नाहीत. त्यामुळेच, पोलिसांनी अनेक राज्यात छापेमारी सुरू केली आहे

Coronavirus: Four men arrested for throwing stones at police at mosque for investigation in bihar madhubani | Coronavirus: तपासासाठी मस्जीदमध्ये गेलेल्या पोलिसांवर दगडफेक, चौघांना अटक

Coronavirus: तपासासाठी मस्जीदमध्ये गेलेल्या पोलिसांवर दगडफेक, चौघांना अटक

googlenewsNext

पाटणा - जगभरात कोरोनाने थैमान घातले असून भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही दिवसागणिक वाढत आहे. याच दरम्यान दिल्लीत झालेल्या एका धार्मिक संमेलनात सहभागी झालेल्या दोन हजारांपेक्षा अधिक लोकांमुळे कोरोनाचे लोण देशाच्या अनेक राज्यांत पसरले असल्याची शक्यता समोर आली आहे. यामध्ये सहभागी झालेल्यांपैकी काही जणांचे मृत्यू झाले आहेत. आणखी 200 जणांमध्ये प्राथमिक लक्षणे दिसू लागल्याने या आजाराचा धोका आणखी वाढला आहे. आता, पोलिसांकडून या कार्यक्रमातील सहभागी नागरिकांची धरपकड सुरु आहे. मात्र, तेथील जमावाकडून पोलिसांशी अरेरावी होत असल्याचे समोर आले आहे.

तबलीगी जमातीमध्ये सहभागी झालेले नागरिक पोलिसांशी सहकार्याच्या भूमिकने वागत नाहीत. त्यामुळेच, पोलिसांनी अनेक राज्यात छापेमारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे काही लोकं मस्जीदमध्ये लपून बसले आहेत, तर विदेशातून आलेल्या मुस्लिमांनाही लपवून ठेवण्यात आल्याचे समजते. त्यामुळे, माहिती मिळताच पोलीस घटनास्थळावर पोहोच आहेत. मात्र, येथे येणाऱ्या पोलिसांवर दगडफेक करण्यात येत असल्याच्या घटना समोर येत आहेत. बिहारमध्ये अशा घटना घडल्याचे वृत्त आहे. येथील मधुबनी जिल्ह्यातील एक मस्जीदमध्ये काही विदेशी मुस्लीम लपून बसल्याची टीप पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार, पोलीस घटनास्थळावर पोहोचले. मात्र, मस्जीदजवळील लोकांनी पोलिसांवर दगडफेक केली. तर, गोळीबारही करण्यात आल्याचं वृत्त आहे. 

अनपेक्षित हल्ल्यामुळे पोलीस आणि बीडीओंनी तिथून धूम ठोकली. मात्र, जमावाने पोलिसांच्या गाडीच्या काचा फोडून तलावात फेकून दिली. त्यानंतर, पोलिसांनी याप्रकरणी १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून चौघांना अटकही केली आहे, याबाबत नवभारत टाईम्सने वृत्त दिले आहे. 

दरम्यान, मधुबनीचे पोलीस अधिक्षक डॉ. सत्य प्रकाश यांनीही या घटनेबद्दल माहिती दिली आहे. सध्या याबाबत तपास सुरू असून हे मुस्लीम नेपाळमधून भारतात आले आहेत, असे प्रकाश यांनी सांगितले. 
 

Web Title: Coronavirus: Four men arrested for throwing stones at police at mosque for investigation in bihar madhubani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.