Coronavirus : दिलासादायक! भारतातील तब्बल 400 जिल्हे कोरोनामुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 03:25 PM2020-04-10T15:25:17+5:302020-04-10T16:38:11+5:30

Coronavirus : कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी देशात सर्व स्तरावर उपाययोजना करण्यात येत आहेत. भारतातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यातही वाढ झाली आहे.

Coronavirus good news 400 districts in india not infected by covid19 SSS | Coronavirus : दिलासादायक! भारतातील तब्बल 400 जिल्हे कोरोनामुक्त

Coronavirus : दिलासादायक! भारतातील तब्बल 400 जिल्हे कोरोनामुक्त

Next

नवी दिल्ली - कोरोनाच्या नियंत्रणासाठी देशात युद्धपातळीवर यंत्रणा कामाला लागली असून सर्व राज्यांमध्ये संशयितांची माहिती घेण्याबरोबर तपासणी, क्वॉरंटाईन सुरू केले आहे. सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांकडूनही शासनाला सहकार्य करण्यात येत आहे. तसेच कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी देशात सर्व स्तरावर उपाययोजना करण्यात येत आहेत. भारतातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यातही वाढ झाली असून रुग्णांची संख्या 6000 वर पोहोचली आहे. मात्र याच दरम्यान काही दिलासादायक बातम्याही समोर आल्या आहेत. देशात असे 400 जिल्हे आहेत जिथे कोरोना अद्याप पोहचू शकलेला नाही. 

देशातील 400 जिल्ह्यांमध्ये सुदैवाने कोरोनाचा आतापर्यंत एकही रुग्ण सापडलेला नाही. आत्तापर्यंत सापडलेल्या कोरोनाग्रस्तांपैंकी जवळपास 80 टक्के रुग्ण केवळ 62 जिल्ह्यांतून सापडले आहेत. या ठिकाणी लॉकडाऊनसोबतच हॉटस्पॉट भागही सील करून व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी एका खासगी चॅनलशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, भारतात अद्यापही असे 400 जिल्हे आहेत जिथे कोरोनाचा अद्याप एकही रुग्ण आढळलेला नाही.

80 टक्के रुग्ण केवळ 62 जिल्ह्यांतून सापडले आहेत. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याची गरज आणि शक्यताही कुमार यांनी यावेळी व्यक्त केली. भारतात आतापर्यंत कोरोनामुळे 160 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. जगातील सर्वच देश कोरोनाशी सामना करत असून कोरोना व्हायरसचा वाढता प्रसार रोखण्यासाठी  प्रयत्न करत आहेत. भारतातदेखील कोरोनाला आळा घालण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आल्याची घोषणा केली. तसेच लोकांना घरातून बाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. 

कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूनं जगभरात थैमान घातलं असताना, कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत असताना काही सकारात्मक घडामोडीदेखील घडत आहेत. एका बाजूला अमेरिकेत गेल्या काही दिवसांपासून शेकडो जणांचे बळी जात असताना दुसरीकडे जगभरात आतापर्यंत साडे तीन लाखांपेक्षा अधिक रुग्ण बरे झाले आहेत. मृतांच्या तुलनेत बऱ्या झालेल्यांची संख्या जवळपास चौपट आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : धक्कादायक! लॉकडाऊनमुळे धान्य विकण्यात अडचण, शेतकऱ्याची आत्महत्या

Coronavirus : ...म्हणून 'या' देशाने थांबवला हायड्रोक्सीक्लोरोक्वीनचा वापर

 coronavirus : अमेरिका, युरोपमध्ये कोरोनाचे थैमान थांबता थांबेना, जगभरात 90 हजारांहून अधिक मृत्युमुखी

CoronaVirus: दिलासादायक! कोरोनाबद्दलची 'ही' आकडेवारी वाचून तुम्हालाही बरं वाटेल

 

Web Title: Coronavirus good news 400 districts in india not infected by covid19 SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.