ब्लॅक फंगसचा धोका वाढला; सरकारकडून नवे कोविड प्रोटोकॉल जारी; पाहा नियमावली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 12:11 PM2021-05-26T12:11:03+5:302021-05-26T12:11:26+5:30
ब्लॅक फंगसचा धोका टाळण्यासाठी सरकारकडून नव्या सूचना जारी
नवी दिल्ली: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. कोरोनाचे रुग्ण कमी होत असताना ब्लॅक फंगसचे रुग्ण वाढत आहेत. कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांना ब्लॅक फंगसची (म्युकोरमायकोसिस) लागण होत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे सरकारनं कोरोना उपचारांमध्ये नव्या प्रोटोकॉल्सचा समावेश केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आलेल्या सूचनांचा कोरोना उपचार नियमावलीत अंतर्भाव करण्यात आला आहे.
भयावह! ५ महिने, ६ शस्त्रक्रिया, ३९ इंजेक्शन्स; उपचारांसाठी घरही विकलं; तरीही ब्लॅक फंगस पाठ सोडेना
कोरोना रुग्णांवर उपचार करताना स्टेरॉईड्सचा वापर केला जातो. ब्लॅक फंगसची लागण होण्यास स्टेरॉईड्स कारणीभूत असल्याचं संशोधनातून समोर आलं आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांवर उपचार करताना वापरायच्या औषधांबद्दल आरोग्य मंत्रालयानं महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. 'कोरोनाचा विषाणू हवेतून पसरू शकतो. कोरोना रुग्णांवर उपचार करताना स्टेरॉईड्स, रेमडेसिविर आणि टोसिलिजुमॅब औषधांचा योग्यपणे वापर करण्यात यावा. कोरोना रुग्ण बरे झाल्यानंतर त्यांच्या शरीरावर कोणतेही विपरित परिणाम होऊ नये, गुंतागुंत निर्माण होऊ नये या गोष्टी विचारात घेऊन औषधांचा काळजीपूर्वक वापर केला जावा,' अशा सूचना सरकारकडून देण्यात आल्या आहेत.
माहेरी जाताना नवऱ्याला बाईक थांबवायला सांगितली, सासू अन् मुलीसमोर नदीत उडी घेतली; अन्...
कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी वापरण्यात येणाऱ्या स्टेरॉईड्समुळे ब्लॅक फंगसचा धोका वाढत असल्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. देशातील ब्लॅक फंगसच्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. अनेक राज्यांनी या आजाराला महामारी घोषित केलं आहे. ब्लॅक फंगसचा वाढता धोका लक्षात घेता कोरोना रुग्णांवर उपचार करताना स्टेरॉईड्सचा काळजीपूर्वक वापर करावा, असा सल्ला काही दिवसांपूर्वीच एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिला.